ओम निष्काम कर्मयोगी शिव अवतारी जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या कृपार्शिवादने व त्यांचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचा श्री क्षेत्र प्रयागराज महाकुंभमेळ्यात जगद्गुरू पट्टाभिषेक झाल्याप्रित्यर्थ अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी येथे १५ मार्च २०२५ रोजी भव्य स्वागत व पूजन सोहळा कार्यक्रम पार पडला. महेशदादा लांडगे यांच्या निवासस्थान जवळ असलेल्या शिवमंदिरापासून मिरवणुकीला सुरवात झाली. या मिरवणुकीत श्री जनार्दन स्वामी महाराज यांची पालखी सोबत डोक्यावर कळस घेऊन मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या. हाती टाळ झेंडे आणि विठू सोबत जनार्दन च्या नामघोषात वारकरी बाल मित्रांनी या मिरवणुकीची शोभा वाढवली.
मिरवणूक सभागृह जवळ येताच फटाके आतषबाजी आणि आरतीने बाबाजींचे स्वागत करण्यात आले. भक्तांच्या उपस्तिथीत सभागृह पूर्णपणे भरलेला होता. स्वामी रामानंद महाराज यांनी नित्य नेम विधी सुरवात करून जगण्यासाठी काय गरजेचे आहे यावर थोडक्यात प्रवचन आणि माहिती दिली. सभागृह पूर्णपणे भक्तिमय वातावरण ने मंत्रमुग्ध झाला होता. साधुसंतांचे आणि मान्यवरांचे पूजन करून जोशी परिवार तर्फ़े श्री बाबाजींचे पूजन करून त्यांच्या चरणी गुलाबाचा हार अर्पण करण्यात आले. ज्या ज्या कार्यकर्त्यानी या कार्यक्रमास कार्य केले त्यांचे देखील बाबाजींच्या समोर पूजन करून पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. तसेच जय बबाबाजी पुणे तर्फे काय काय कार्यक्रम पुढे होणार आहेत याची देखील माहिती आलेल्या भक्तांना देण्यात आले.
बाबाजी साठी भक्तांनी त्यांच्या राहण्यासाठी एक कुठी उभारली होती. या कुटी मध्ये बाबाजींनी एक रात्र वास्तव्य केले. दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता नित्यनेम विधी झाली. बाबाजींनी आलेल्या भक्तांना आशीर्वाद दिले आणि मुंबई च्या दिशेने रवाना झाले. पुण्यात कार्यक्रम च्या आधी ते जळगाव जालना येथे कार्यक्रमास हजेरी लावून आले होते.