19.1 C
New Delhi
Sunday, October 26, 2025
Homeताज्या बातम्याहडपसर येथे गोमातेची अवैध वाहतूक; शिवसेनेची दोन ठिकाणी कारवाई..!

हडपसर येथे गोमातेची अवैध वाहतूक; शिवसेनेची दोन ठिकाणी कारवाई..!

गोधनाची अवैध वाहतूक करणाऱ्या नराधमांना शिवसेना आयुष्याभराची अद्दल घडवणार – शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे

पुणे

*पुणे शहरातील हडपसर मतदारसंघातील काळेपडळ, कृष्णानगर परिसरात गोधनाची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी तत्काळ  धाव घेत गोमातेची सुटका करत गोमातेची अवैध वाहतूक करणाऱ्या  नराधमांना पोलिसांच्या स्वाधीन केले*

शिवसेनेचे डॅशिंग शहरप्रमुख म्हणून ओळख असलेले प्रमोद नाना भानगिरे आज पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पुणे शहरातील हडपसर मध्ये काळेपडळ कृष्ण नगर येथे गोमातेची अवैधरीत्या होत असलेल्या वाहतुकीची गुप्त माहिती शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांना मिळाली. यावेळी प्रमोद नाना भानगिरे यांनी तत्काळ त्याठिकाणी धाव घेत शिवसेनेच्या गोभक्तांसमवेत गोमातेची सुटका करत या नराधमांना पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी गोमांस देखील सापडले असून दोन गाईंची अवैध वाहतूक करणाऱ्या नराधमांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिला असून पुणे शहरात होत असलेल्या गोहत्या बाबत शिवसेना यापुढे कठोर पावले उचलणार असून पुणे शहरात कोणत्याही परिस्थितीत शिवसेना गोहत्या सहन करणार नाही. यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास यास प्रशासन जबाबदार असल्याचे प्रमोद नाना भानगिरे यांनी सांगितले. त्याचबरोबर होत असलेल्या गोहत्या तत्काळ थांबवाव्यात अन्यथा शिवसेनेच्या वतीने पुणे शहरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करण्याचा इशारा भानगिरे यांनी दिला आहे, त्याचबरोबर फक्त नराधमांनाच नाही तर यामागील सूत्रधार शोधून त्यावरही कठोर कारवाई करावी आणि गोहत्या रोखण्यास पोलीस प्रशासनाने प्रयत्न करावेत असेही प्रमोद भानगिरे यांनी म्हटले, पुणे शहरात गोमातेची अवैध वाहतूक व गोहत्येसाठी केला जाणारा प्रयत्न शिवसेना त्वेषाने हाणून पाडेल. गोमातेची अवैध वाहतूक अथवा गोमातेच्या हत्येचा प्रयत्न झाल्यास त्या नराधमांना शिवसेना आयुष्याची अद्दल घडवेल असेही प्रमोद नाना भानगिरे यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
19.1 ° C
19.1 °
19.1 °
82 %
0kmh
0 %
Sun
32 °
Mon
32 °
Tue
30 °
Wed
32 °
Thu
30 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!