15.1 C
New Delhi
Monday, November 10, 2025
Homeताज्या बातम्याआता खड्ड्यांची तक्रार करा सहजपणे – नवीन ॲपद्वारे त्वरित नोंदणी

आता खड्ड्यांची तक्रार करा सहजपणे – नवीन ॲपद्वारे त्वरित नोंदणी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा नाविन्यपूर्ण उपक्रम, खड्डे व्यवस्थापन प्रणाली करण्यात आली विकसित

पिंपरी, – : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने खड्डे व्यवस्थापन प्रणाली विकसित केली असून आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ती सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत ‘पॉटहोल मॅनेजमेंट’ हे नाविन्यपूर्ण अॅप विकसित करण्यात आले असून नागरिकांना या अॅपद्वारे खड्ड्यांची तक्रार नोंदवता येणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मान्सूनपूर्व तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळ्यामध्ये खड्ड्यांची समस्या सातत्याने उद्भवते. या समस्येवर उपाय म्हणून महानगरपालिकेने पॉटहोल अॅप विकसित केले आहे. या अॅपमुळे खड्डयांची तक्रार नोंदवणे आणि त्या तक्रारींचे निराकरण करण्याची प्रक्रिया सोपी व सुलभ होणार आहे. नागरिक या अॅपद्वारे खड्ड्याची तक्रार नोंदवू शकतात, आणि त्या तक्रारीच्या निराकरणाविषयी अद्ययावत माहिती मिळवू शकतात.

नागरिकांना अशी नोंदवता येणार तक्रार

अॅपद्वारे खड्ड्याची तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांना प्रथम पॉटहोल अॅपमध्ये लॉगिन करावे लागणार आहे. त्यानंतर नागरिक खड्याचे फोटो काढून त्याच्या स्थानासह (Geo Location) ते अपलोड करू शकतात. ही माहिती आपोआप संबंधित विभागातील कनिष्ठ अभियंत्यांना त्यांच्या प्रभागानुसार पाठवली जाईल. याच वेळी ती माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठवली जाईल. तक्रारी नोंदवल्यानंतर तिचे निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडे दिली जाईल. दिलेल्या तक्रारीचे निराकरण झाले नाही, तर त्या भागातील वरिष्ठ अधिकारी यांना ईमेल व संदेश पाठवण्यात येईल. एखादी तक्रार कनिष्ठ अभियंता यांच्या अधीन नसल्यास ती महानगरपालिकेच्या ज्या विभागाशी आहे, त्या संबंधित विभागाकडे पाठवण्यात येईल. तक्रारीचे निराकरण संबंधित विभाग किंवा अभियंता यांनी केल्यानंतर ती तक्रार अॅपमध्ये बंद केली जाईल आणि तक्रारदारास फोटोसह निराकरणाची माहिती ईमेल / संदेशाद्वारे कळवली जाईल.
…….
मोबाईल अॅप डाऊनलोड करा

  1. Smart Sarathi PCMC Mobile Application आपल्या मोबाईलवर Google Play Store किंवा Apple App Store वरून डाऊनलोड करा (जर आधीपासून इंस्टॉल नसेल तर).
  2. अॅपमध्ये PCMC Services विभागात जाऊन “Report Pothole / खड्‌डे नोंदवा” App निवडा. यामु‌ळे आपल्याला अॅप स्टोअरवर रिडायरेक्ट केले जाईल.
  3. थेट अॅप स्टोअरमध्ये “PCMC Pothole Management” असे शोधून अॅप डाऊनलोड करता येईल.
  4. किंवा खालील QR कोड वापरुन मोबाइल अप्लिकेशन डाउनलोड करू शकता
    ……
    नोंदणी करा आणि ईमेल OTP दवारे प्रमाणीकरण कराः
  5. युजरनेम आणि पासवर्ड (आपण ठरवलेले)
  6. पूर्ण नाव
  7. मोबाईल नंबर व ई-मेल आयडी
  8. Send OTP” या बटणावर क्लिक करा आणि ईमेलवर आलेला OTP टाकून नोंदणी पूर्ण करा.
    ………

तक्रार कशी नोंदवायची आणि तक्रार ट्रॅकिंग कशी करता येईल?

  1. मोबाईलमध्ये लोकेशन सर्व्हिसेस ऑन करा.
  2. “Zoom GPS Location” वर क्लिक करून सध्याचे लोकेशन पहा. आणि नकाशावर खड्ड्‌याचे स्थान निवडा. व जवळचा ओळखण्याजोगा पत्ता/संदर्भ दया.
  3. समस्या प्रकार निवडा (उदा. कमी खोल खड्‌डा, खोल खड्‌डा, चैबर डॅमेज, युटिलिटी ट्रैच डॅमेज, इ.).
  4. अंदाजे लांबी व रुंदी (मीटरमध्ये) प्रविष्ट करा.
  5. खड्ड्याचे स्पष्ट फोटो अपलोड करा. आणि तक्रार सबमिट करा. आपल्याला एक युनिक तक्रार क्रमांक (Complaint ID) दिला जाईल, ईमेलद्‌वारे ट्रैकिंग लिंकसह पुष्टीकरण मिळेल.

(https://gisapp0824.giscdn.net/PotHoleManagementPCMC/complaint-status)

ही तक्रार संबंधित PCMC अभियंत्याकडे पाठवली जाईल, जे योग्य ती कारवाई करतील किंवा ती दुसऱ्या संबंधित विभागाकडे पाठवतील. काम पूर्ण झाल्यानंतरचा फोटो व काम पूर्ण झाल्याचा अहवान आपल्या नोंदणीकृत ईमेलवर पाठवला जाईल.
……

पिंपरी चिंचवड शहरातील रस्ते खड्डेमुक्त असावेत, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. नागरिकांना देखील महानगरपालिका हद्दीत असणाऱ्या रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार सहज करता यावी, यासाठी खड्डे व्यवस्थापन प्रणाली सुरू करण्यात येत आहे. खड्डे व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, जबाबदारी आणि कार्यक्षमतेची वाढ करून रस्ते अधिक सुरक्षित व सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

  • शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
15.1 ° C
15.1 °
15.1 °
82 %
0kmh
0 %
Mon
23 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!