8.1 C
New Delhi
Thursday, January 15, 2026
Homeताज्या बातम्यापुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल वाहतुकीस खुला

पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल वाहतुकीस खुला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन

नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

पुणे : सिंहगड रस्त्यावर उभारण्यात आलेल्या दुहेरी उड्डाणपूल प्रकल्पाचे (१ सप्टेंबर) दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी कळविली आहे.

केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, “फनटाईम थिएटर ते विठ्ठलवाडी हा प्रवास आता अधिक सोपा, जलद आणि सुलभ होणार आहे. सिंहगड रस्ता परिसरातील दीर्घकाळाची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा ठरेल.”

प्रकल्पाची माहिती

  • एकूण लांबी: सुमारे २.५ किमी – पुण्यातील सर्वात लांब उड्डाणपूल
  • एकूण खर्च: ११८ कोटी रुपये
  • कामाचा कालावधी: सप्टेंबर २०२१ ते ऑगस्ट २०२५ (नियोजित वेळेपेक्षा सहा महिने आधी पूर्ण)

प्रमुख टप्पे

  • प्रथम टप्पा (१५ ऑगस्ट, २०२४): राजाराम पूल चौकातील ५२० मी. लांबीचा उड्डाणपूल (खर्च १५ कोटी).
  • दुसरा टप्पा (१ मे, २०२५): विठ्ठलवाडी ते फनटाईम, २.१ किमी लांबीचा पूल (खर्च ६१ कोटी).
  • तिसरा टप्पा (१ सप्टेंबर, २०२५): गोयल गंगा चौक ते इनामदार चौक, १.५४ किमी लांबीचा पूल (खर्च ४२ कोटी).

वाहतुकीची कोंडी होणार कमी

  • दररोज हजारो प्रवासी, शालेय बस, व्यवसायिक वाहने आणि सार्वजनिक वाहतूक साधनांचा प्रवास अधिक सुकर.
  • सिंहगड रस्त्यावरील प्रमुख चौक विना-अडथळा पार करण्याची सुविधा.
  • नागरिकांचा दररोज १५ ते २५ मिनिटांचा प्रवास वेळ वाचणार.
  • सिंहगड रस्ता, धायरी, नन्हे, खडकवासला, वडगाव बुद्रुक, नांदेड सिटी, तसेच बेंगळुरू–मुंबई राष्ट्रीय महामार्गाशी जोडणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होणार.

शहरासाठी महत्व

“पुणे हे महाराष्ट्रातील सर्वात वेगाने वाढणारे शहर असून लोकसंख्या आणि वाहनसंख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषतः सिंहगड रस्ता परिसरात सकाळ-संध्याकाळ वाहतुकीचा ताण प्रचंड असतो. अशा परिस्थितीत ११८ कोटींचा सिंहगड रस्ता उड्डाणपूल प्रकल्प हा पुणे शहरातील एक महत्त्वाकांक्षी आणि तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक प्रकल्प पूर्ण व्हावा म्हणून सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.”

  • माधुरी मिसाळ, नगरविकास राज्यमंत्री
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
8.1 ° C
8.1 °
8.1 °
93 %
1.5kmh
0 %
Wed
13 °
Thu
21 °
Fri
23 °
Sat
24 °
Sun
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!