चिंचवड, – पोलिस फ्रेन्डस वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने रविवार, १३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे “शूरा आम्ही वंदिले” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम केवळ एक औपचारिक सोहळा नसून, देशासाठी लढणाऱ्या आणि समाजासाठी योगदान देणाऱ्या शूरवीरांना दिलेला मानाचा मुजरा आहे.
🎖 कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:
या सोहळ्यात १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाक युद्ध, कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेले समर सेनानी, तसेच पोलिस दलात उत्कृष्ठ कामगिरी करणारे अधिकारी आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यात येणार आहे.
👥 कार्यक्रमात उपस्थित राहणारे मान्यवर:
- केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ
- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे
- मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे
- चिंचवडचे आमदार शंकर जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे
- माजी महापौर माई ढोरे, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे
- CRPF पुणेचे डीआयजी राजेशकुमार सिंह
- एसबी पाटील शैक्षणिक संस्थेच्या उपाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे
- पद्मश्री व अर्जुन पुरस्कार विजेते मुरलीकांत पेटकर
- किर्ती चक्र विजेते संतोष राळे, नि. कॅप्टन ए. के. मिश्रा
या कार्यक्रमाबाबत माहिती देताना संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे यांनी सांगितले की, “हा सोहळा म्हणजे देशासाठी तन-मन झोकून देणाऱ्या वीरांना मानाचा मुजरा आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे.”