पिंपरी चिंचवड:
चिंचवडगावातील (chinchawad) गांधीपेठेतील अत्यंत गजबजलेल्या राजा चौकात वाहतूक कोंडी (traffice)आणि अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक त्रस्त होते. या परिसरात वाहने जोरात धावल्याने छोट्या-मोठ्या अपघातांची वारंवारता वाढली होती. विशेषतः चौकातील कोंडी आणि वाहतूक सुरळीत न झाल्याने स्थानिक नागरिकांची चिंतेची रेषा पार झाली होती.
या समस्येवर उपाय म्हणून, गांधीपेठेतील नागरिकांनी तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिकेकडे सतत पाठपुरावा केला. माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, राहुल कलाटे, हरिभाऊ चिंचवडे, योगेश चिंचवडे यांसह श्री संत ज्ञानेश्वर ‘चिंचवडचा राजा’ मित्र मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल सायकर आणि कार्याध्यक्ष महेश मिरजकर यांनी स्थानिक व्यापाऱ्यांसोबत एकत्र येऊन महापालिकेकडे स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी केली होती.
आज, १० एप्रिल रोजी महापालिकेने या मागणीला मान्यता दिली आणि राजा चौकातील सर्व चार बाजूंनी स्पीड ब्रेकर बसवले. या निर्णयामुळे आता या परिसरातील अपघातांची संख्या कमी होण्याची आणि वाहतूक सुरळीत होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
नागरिका काय म्हणाले?
स्पीड ब्रेकर बसविल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. “आता अपघात होण्याचे प्रमाण कमी होईल आणि वाहतूक नियंत्रित होईल,” अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
महापालिका व स्थानिक कार्यकर्त्यांचे कौतुक:
महापालिकेच्या या निर्णायामुळे गांधीपेठेतील नागरिकांनी प्रशासनाची आणि स्थानिक कार्यकर्त्यांची प्रशंसा केली आहे. यामुळे जणू एक महत्त्वपूर्ण समस्या सुटली आहे आणि चांगला कार्यकारिणी निर्णय घेतला गेला आहे.