पुणे, – उन्हाचा तडाखा वाढत असतानाच पुण्यातील सर्वाधिक गजबजलेला आणि महिलांसाठी आवडता बाजार म्हणजे तुळशीबाग. एप्रिलच्या सुरुवातीलाच तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे, अशातच नागरिकांच्या सोयीसाठी एक सामाजिकदृष्ट्या स्तुत्य असा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. संपूर्ण तुळशीबागेवर ग्रीन नेटचे थंड छत्र (Tulshibaug Green Net Pune)उभारण्यात आले असून यामुळे खरेदी करणाऱ्या महिलांना आणि दुकानदारांनाही उकाड्यातून दिलासा मिळाला आहे.
हा उपक्रम खास आमदार हेमंत रासने यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आला असून त्यांच्याच हस्ते ग्रीन नेट लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

✅ देशात पहिलाच उपक्रम – संपूर्ण बाजार छायेत
पुणे महापालिका, नगर पथ विक्रेता समिती आणि हॉकर्स आघाडी – भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम हाती घेण्यात आला. सागर सुनिल दहिभाते यांच्या संयोजनातून जवळपास चार टप्प्यांमध्ये एक किलोमीटर परिसरात ग्रीन नेट बसवण्यात आले आहे.
या ग्रीन नेटने बँक ऑफ महाराष्ट्रपासून ते श्री गजानन मंडळ ट्रस्ट, ज्वेलरी बोर्ड, कावरे कोल्ड्रिंक्स आणि तुळशीबाग गणपती मंदिरापर्यंतचा सगळा व्यापारी पट्टा (BJP Pune civic projects) झाकण्यात आला आहे. यामुळे दुकानदार आणि ग्राहकांना उन्हाचा त्रास होणार नाही, उलट थंड सावलीत खरेदीचा अनुभव मिळणार आहे.
🗣️ “कसबा मतदारसंघ देशातही आदर्श ठरेल” – आमदार हेमंत रासने
“लोकप्रतिनिधी म्हणून मी केवळ विकासकामेच नव्हे, तर नागरिकांच्या रोजच्या अडचणी दूर करण्याचाही प्रयत्न करत असतो. तुळशीबागेतील उकाड्यामुळे ग्राहक आणि दुकानदारांना त्रास होत होता, म्हणून सावलीसाठी ग्रीन नेट लावण्याचा निर्णय घेतला. हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपत राबवण्यात आला आहे.” ते पुढे म्हणाले, “जसे इंदौर शहर स्वच्छतेसाठी देशात प्रसिद्ध आहे, तसेच पुण्यातील कसबा मतदारसंघही आदर्श ठरेल, असा आत्मविश्वास आहे.“

🎁 विशेष उपक्रम – महिलांना ग्रंथ भेट
या प्रसंगी उपस्थित महिलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पुस्तके भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण सोनार यांनी केले तर साई डोंगरे यांनी आभार प्रदर्शन केले.
👏 सावलीमुळे समाधान – व्यापाऱ्यांपासून ग्राहकांपर्यंत समाधान
या ग्रीन नेटमुळे तुळशीबागेत खरेदी करणाऱ्या नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. उन्हाच्या झळा टाळून आता ग्राहक सहज आणि आरामदायक पद्धतीने खरेदी करू शकतात, हे तिथल्या विक्रेत्यांसाठीही मोठे दिलासादायक आहे.
📌 ठळक मुद्दे –
- देशात पहिल्यांदाच एखाद्या बाजारपेठेत 1 किमी परिसरात ग्रीन नेट बसविण्यात आली.
- उन्हाच्या झळांपासून ग्राहक व दुकानदार दोघांनाही दिलासा.
- आमदार हेमंत रासने यांच्या निधीतून उपक्रम राबविला.
- महिलांना शिवचरित्रावर आधारित ग्रंथ भेट.
- पुणे महापालिकेचा अभिनव उपक्रम देशासाठी आदर्श ठरणार.