पंढरपूर – श्री विठ्ठल रुक्मिणी Vitthal Rukmini मातेच्या नित्यपुजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, चंदन उटी पूजा इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. दि. 01 एप्रिल ते 31 जुलै, 2025 या कालावधीतील पुजांची ऑनलाईन पध्दतीने नोंदणीची सुरवात दि.25 मार्च रोजी स.11.00 पासून करण्यात आली होती. त्यास भाविकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असून, पहिल्याच दिवशी श्री विठ्ठलाच्या नित्यपुजा व चंदनउटी पुजेची नांदणी पुर्ण झाल्याची माहिती मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
यापूर्वी पहिल्या टप्प्यात दि. 7 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2024 व दुसऱ्या टप्प्यात दि.1 जानेवारी ते 31 मार्च 2025 या कालावधीतील व आता तिस-या टप्प्यात दि. 01 एप्रिल ते 31 जुलै, 2025 या कालावधीतील श्रींच्या सर्व पुजा भाविकांना ऑनलाईन पध्दतीने नोंदणीस उपलब्ध करून दिल्या होत्या. या तिस-या टप्प्यामध्ये आपल्या राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून व देशभरातून कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातील भाविकांनी पूजेची नोंदणी केली आहे.
त्यामध्ये श्री विठ्ठलाच्या नित्यपुजा व चंदनउटी पुजा फुल्ल झालेल्या आहेत. याशिवाय, रूक्मिणीमातेच्या नित्यपुजा व चंदनउटी पुजा अनुक्रमे 62 व 18 तसेच पाद्यपुजा 240 व तुळशी अर्चन पुजा 90 बुकींग झालेल्या आहेत. यामधून सुमारे 75 लक्ष इतकी देणगी मिळाली आहे.
भाविकांना https://www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून पूजेची नोंदणी करता येईल. ऑनलाईन पध्दतीने पुजा उपलब्ध करून दिल्यामुळे भाविकांना घरबसल्या पुजा नोंदणी करता येत असल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त होत आहे व या ऑनलाईन नोंदणीला चांगला प्रतिसाद भाविकांनी दिल्याने, मंदिर समितीच्या वतीने भाविकांचे व्यवस्थापक मनेाज श्रोत्री यांनी यावेळी आभार व्यक्त केले.