पुणे : तस्करी करुन आणलेले चार कोटी ४७ लाख रुपयांचे सहा किलो सोने महसूल गुप्तचर संचालनालयाच्या(डीआरआय) पथकाने तळेगाव टोल नाका परिसरात जप्त केले. मुंबईहून पुण्यात बसने तस्करी करुन आणलेले सोने पाठविण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर ‘डीआरआय’च्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध सीमाशुल्क अधिनियम १९६२ च्या तरतूदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईहून तस्करी करुन आणलेले सोने खासगी बसने पुण्यात पाठविले जाणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने सापळा लावून कारवाई केली. बसमधील संशयित व्यक्तींची झडती घेण्यात आली. तेव्हा दोन पाकिटात सोने सापडले. औषधी कॅप्सुलमध्ये सोन्याची भुकटी भरल्याचे उघडकीस आले. ‘डीआरआय’च्या पथकाने चौकशी केली. त्यानंतर तस्करी करुन आणलेले सोने पुरविणारा, त्याच्या साथीदारांना मुंबई आणि पुण्यातून अटक करण्यात आली. चौघे आरोपी तस्करी करुन आणलेल्या सोन्याची विक्री करत असल्याची माहिती तपासात मिळाली.
तस्करी करुन आणलेले साडेचार कोटींचे सोने जप्त
महसूल गुप्तचर संचलनालयाची कारवाई
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
36.1
°
C
36.1
°
36.1
°
4 %
4.2kmh
0 %
Wed
36
°
Thu
41
°
Fri
42
°
Sat
40
°
Sun
42
°