15.1 C
New Delhi
Wednesday, January 15, 2025
Homeदेश-विदेशमहाराष्ट्रानंतर "या" राज्यात वाजला निवडणुकीचा बिगुल

महाराष्ट्रानंतर “या” राज्यात वाजला निवडणुकीचा बिगुल

५ फेब्रुवारी रोजी मतदान ; ८ ला होणार मतमोजणी


नवी दिल्ली : महाराष्ट्रानंतर संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या राजधानी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं आज केली. त्यानुसार, दिल्लीत ५ फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून निकाल ८ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. त्यानुसार, दिल्लीतील ७० विधानसभा मतदारसंघात ५ फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी मतदान(election) होईल. निवडणूक आयोगाने नुकतीच निवडणुकीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली होती. त्यानंतरच दुसऱ्याच दिवशी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. राष्ट्रीय राजधानीत १ कोटी ५५ लाख २४ हजार ८५८ नोंदणीकृत मतदार असून, त्यात १.०९ टक्क्यांची वाढ झाली आहे.
‘भारतानं निवडणुकांचा एक सुवर्ण मानदंड स्थापित केला आहे. हा आमचा सामायिक वारसा आहे. निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहाराला वाव नाही. आयोगाची कार्यपद्धती इतकी स्पष्ट आहे. व्यक्तिगत काही चूक झाल्यास योग्य ती शिक्षा देण्यास आयोग सक्षम आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आरोप करताना हवेत गोळीबार करण्याची गरज नाही. तुम्ही पुरावा दाखवा, या ठिकाणी असं घडून येते आहे हे सांगा आम्ही कारवाई करु. मागच्या म्हणजेच महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या दरम्यान एक हो हल्ला पाहण्यास मिळाला. तो म्हणजे आमचे हेलिकॉप्टर तपासत आहात, त्यांचे का नाही तपासलं? यांचं का नाही तपासलं? घाणेरड्या भाषेचा उपयोगही केला गेला. आम्ही उत्तर दिलं नाही संयम ठेवला. मतदानाच्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांना धमक्या देण्यापर्यंत काहींची मजल गेली. मात्र आम्ही शांत बसलो. स्टार प्रचारक आणि राजकीय नेते यांनी शिष्टाचार आणि सभ्यता पाळली पाहिजे. महिलांच्या विरोधात बोलू नका, मुलांच्या विरोधातही काहींनी भाष्य केलं. अशा लोकांना आमची हात जोडून विनंती आहे की प्रचाराची पातळी एवढी घसरु देऊ नका की त्यामुळे मतदानाला येण्याची नव्या पिढीची इच्छाच निघून जाईल. प्रचाराच्या वेळी शालीनता ठेवली पाहिजे. असं म्हणत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता त्यांना खडे बोल सुनावले आहेत. तसंच ज्या नेत्यांनी महिलांचं नाव घेऊन आक्षेपार्ह वाक्यं वापरली त्यांनाही सुनावले आहे.
उद्धव ठाकरे शिवसेना ठाकरे गटाचे औसा मतदारसंघातील उमेदवार दिनकर माने यांच्या प्रचारासाठी गेले असताना निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांची बॅग तपासण्यात आली . त्यावरुन, उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला. तसेच, आत्तापर्यंत किती जणांची बॅग तपासली असा सवाल संबंधितांना केला. त्यावर, तुम्हीच पहिले आहात असे उत्तर कर्मचाऱ्यांनी दिले असता, दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक का, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ स्वत:च शुट केला. हीच घटना सलग तीन दिवस झाली. त्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले होते. आता राजीव कुमार यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना खडे बोल सुनावले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
15.1 ° C
15.1 °
15.1 °
82 %
2.6kmh
40 %
Wed
17 °
Thu
22 °
Fri
22 °
Sat
22 °
Sun
23 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!