दिल्ली : शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवनियुक्त अध्यक्षा विजया रहाटकर यांची त्यांच्या दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले आणि आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रहाटकर यांच्या कामाचा गौरव करताना सांगितले की, त्यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही उत्कृष्टपणे जबाबदारी पार पाडली आहे. यामध्ये त्यांनी महिलांच्या लैगिक छळाबाबत आवाज उठवत मोलाचे कार्य केले. तसेच यादरम्यान त्यांनी महिलांवरील अन्याय रोखण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले. याखेरीज त्या प्रत्येक गोष्टींची माहिती ठेवत असतात. छत्रपती संभाजी नगर पासून ते राजस्थान भाजपच्या सहप्रभारी असलेल्या विजया रहाटकर यांच्यासोबत कायम संवाद होत असतो. त्या एक व्यक्ती म्हणून देखील चांगल्या असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.
New Delhi
haze
19.1
°
C
19.1
°
19.1
°
55 %
4.1kmh
20 %
Tue
25
°
Wed
26
°
Thu
23
°
Fri
24
°
Sat
23
°