26.1 C
New Delhi
Sunday, February 9, 2025
Homeदेश-विदेशशक्तीप्रदर्शनाने प्रियंका गांधीचा उमेदवारी अर्ज दाखल

शक्तीप्रदर्शनाने प्रियंका गांधीचा उमेदवारी अर्ज दाखल

नवी दिल्ली –  प्रियांका गांधी यांनी वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांचे बंधू राहुल गांधी उपस्थित होते.प्रियांका वायनाडमधून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी तिथे राहुल खासदार होते. त्यांच्या नामांकनादरम्यान एक मोठा रोड शोही आयोजित करण्यात आला होता. त्यात काँग्रेस समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या नामांकनासह प्रियंका गांधी यांच्या संसदीय राजकारणातील प्रवेशाला प्रारंभ झाला आहे.वायनाड आणि रायबरेली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकलेल्या राहुल गांधी यांनी वायनाड सोडण्याचा निर्णय घेतल्याने वायनाड लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक आवश्यक बनली. निवडणूक आयोगाने वायनाड पोटनिवडणुकीची घोषणा केल्यानंतर लगेचच काँग्रेसने प्रियांका गांधी या जागेवरून उमेदवार असतील, अशी घोषणा केली होती. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
26.1 ° C
26.1 °
26.1 °
12 %
2.8kmh
3 %
Sun
27 °
Mon
28 °
Tue
29 °
Wed
28 °
Thu
27 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!