पंढरपूर- श्री विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीवर बसविण्यात येणाऱ्या मेघडंबरीसाठी आवश्यक असणारी दोन कोटी रुपये किंमतीची २२५ किलो चांदी एका अज्ञात भक्ताने दान केली आहे. या दानशूर भक्ताने नाव जाहीर करण्यास नकार दिला आहे. चांदी प्राप्त होताच मेघडंबरी चांदीने मढविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा १७ जुलैला होत आहे. त्याअनुषंगाने दर्शनासाठी पंढरीत भाविकांची गर्दी देखील वाढू लागली आहे.vithalmandir
पंढरीत भाविकांची गर्दी देखील वाढू लागली आहे. येत्या 4 जुलैपर्यंत चांदीने मढवलेली ही मेघडंबरी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या गाभार्यात बसवण्यात येणार आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याचे काम पुरातत्व विभागामार्फत सुरू आहे. त्यामध्ये श्री विठ्ठल गाभारा व श्री रूक्मिणी गाभारा येथील मेघडंबरी काढण्यात आल्या आहेत. परंतू आता तेथील संवर्धनाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात आले आहे. श्री विठ्ठल गाभारा व श्री रूक्मिणी गाभारा येथील मेघडंबरी देखील नव्याने तयार करून बसविण्यात येत आहे. त्यासाठी श्रीसंत कबीर महाराज मठ व फडातर्फे कबीर महाराज मठाचे ह.भ.प.विष्णू महाराज कबीर यांनी सेवाभावी तत्वावर दोन मेघडंबरी मंदिर समितीस उपलब्ध करून दिल्या आहेत.vithumauli pandharpur
चार जुलैपर्यंत चांदीने मढवलेली ही मेघडंबरी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या गाभाऱ्यात बसविण्यात येणार आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याचे काम पुरातत्त्व विभागामार्फत सुरू आहे. त्यामध्ये श्री विठ्ठल गाभारा व श्री रुक्मिणी गाभारा येथील मेघडंबरीदेखील काढली होती. pandurang
श्री विठ्ठल गाभारा व श्री रुक्मिणी गाभारा येथील मेघडंबरीदेखील नव्याने तयार करून बसविण्यात येत आहे. त्यासाठी श्रीसंत कबीर महाराज मठ व फडातर्फे मठाचे ह. भ. प. विष्णू महाराज कबीर यांनी सेवाभावी तत्त्वावर दोन मेघडंबरी मंदिर समितीस उपलब्ध करून दिल्या आहेत.
या दोन्ही मेघडंबरी पंढरपूर येथील अमोल सुतार, बाळू सुतार, पांडुरंग लोंढे या कारागिरांनी तयार केल्या आहेत. त्यासाठी देवरूख (जि. रत्नागिरी) येथील तीन ते चार वर्षांपूर्वीच्या सागवाणी लाकडाचा वापर केला आहे. श्री विठ्ठलाच्या मेघडंबरीचे वजन १६०, तर श्री रुक्मिणी मातेच्या मेघडंबरीचे वजन ११० किलो आहे. या दोन्ही मेघडंबरीचे सुमारे तीन लाख ५० हजार इतके बाजारमूल्य आहे. मेघडंबरी तयार करण्यासाठी ३५ ते ४० दिवसांचा कालावधी लागला आहे. मेघडंबरी बनविण्याचे काम मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज देशमुख जळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले आहे. या दोन्ही मेघडंबरीला एका अज्ञात भाविकाने मंदिर समितीकडे संपर्क साधून मेघडंबरींसाठी लागणारी २२५ किलो चांदी दान केली आहे.