12.1 C
New Delhi
Thursday, December 5, 2024
Homeदेश-विदेशसिडको हद्दीतील समस्या सोडवा - खासदार श्रीरंग बारणे

सिडको हद्दीतील समस्या सोडवा – खासदार श्रीरंग बारणे

पनवेल – मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विभागातील सिडकोच्या अख्यत्यारित येणा-या भागातील नागरिकांच्या समस्यांचे तत्काळ निराकरण करावे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नादुरुस्त आहेत. त्या प्रकल्पांचे नूतनीकरण करुन पनवेल महापालिकेकडे हस्तांतरित करावेत, सेंट्रल पार्क विकसीत करावे, अशा सूचना मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी अधिका-यांना केल्या.

सिडको क्षेत्रामध्ये अनेक समस्या असून नागरिक त्रस्त आहेत. नागरिकांनी या समस्यांबाबत खासदार बारणे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार बारणे यांनी बेलापूर येथील सिडकोच्या कार्यालयात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगला यांच्यासोबत बैठक घेतली. त्यावेळी सहव्यस्थापकीय संचालक गणेश देशमुख, सहव्यस्थापकीय संचालक दिलीप ढोले, एन. एम. मानकर, मुख्य अभियंता बायस, मुख्य भूमी अभिलेख अधिकारी शीला कुरुणाकरन, पाणीपुरवठा अधिक्षक अभियंता समाधान खतकळे, महाव्यवस्थापकीय सामाजिक सेवा विशाल ढगे, शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे , अतुल भगत, उरण विधानसभा महिला संघटिका मेघाताई दमडे, उरण विधानसभा संघटक दीपक ठाकूर, पारगाव सरपंच बाळाराम नाईक व सिडको तसेच पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

पनवेल महापालिकेला कचरा टाकण्यासाठी मैदान नाही. महापालिकेची जागेची मागणी आहे. त्यासाठी सिडकोने जागा उपलब्ध करुन द्यावी. सिडको अंतर्गत पंतप्रधान आवास योजना झाली असून तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सिडकोने सहकार्य करावे, असे बारणे म्हणाले.

कोंडाण धरणाबाबत सिडको आणि राज्य सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भविष्यात 400 टीएसी पाणी उपलब्ध होईल. एमजीपीच्या माध्यमातून डिसेंबरपर्यंत 200 एमएलडी पाणी उपलब्ध होईल. कामोठे येथील वसाहतीत विद्युतची समस्या आहे. सबस्टेशनसाठी सिडकोकडून आरक्षित भूखंड महावितरणच्या ताब्यात देण्याची ग्वाही सिंगला यांनी दिली. तसेच सेंट्रल पॅाईंट विकसित करण्याबाबत लवकर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या.

कळंबोली परिसरात असलेल्या स्टील मार्केटकडे जाणारा रस्ता करण्यासंदर्भात निविदा काढून रस्ता पूर्ण करावा. डोंगीपारगाव या भागात अतिवृष्टीमुळे पाणी जाते. तिथे पायाभूत सुविधा द्याव्यात. डोंगीगावाचे पुनर्वसन केले जाईल. कामोठे येथील दि. बा. पाटील मैदानावर सर्व सुविधा निर्माण करुन महापालिकेकडे हस्तांतिरत केले जाईल. नैना प्रकल्पातील रस्ते, इतर सुविधांबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. स्थानिक बाधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊन गेली अनेक वर्ष रखडलेल्या प्रकल्पाला गती देण्याचे सिडको प्रशासनाने केले. नवी मुंबईत येथे सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, संपूर्ण सिडको परिसरातील नागरिकांना सोयी-सुविधा देण्याची सूचना खासदार बारणे यांनी केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
12.1 ° C
12.1 °
12.1 °
66 %
1.5kmh
0 %
Thu
25 °
Fri
25 °
Sat
25 °
Sun
25 °
Mon
20 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!