पंढरपूर, – चैत्री यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात हरिनामाचा गजर गगनात भरलेला असतानाच, श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेच्या चरणी भाविकांनी उदंड प्रेमाने दानसागर वाहिला. मंदिर समितीला या यात्रेदरम्यान तब्बल २ कोटी ५६ लाख ५५ हजार ५५ रुपये इतकं उत्पन्न मिळालं असल्याची माहिती व्यवस्थापक श्री. मनोज श्रोत्री यांनी दिली.
राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर परराज्यातूनही लाखो भाविकांनी दर्शनासाठी पंढरपूर गाठलं. ३० मार्च ते १२ एप्रिल या कालावधीत मिळालेल्या उत्पन्नात लाडू प्रसाद, देणग्या, भक्तनिवास, पूजा, फोटो विक्री, हुंडीपेटी आणि सोने-चांदी अर्पण यांचा समावेश आहे.
तपशीलवार उत्पन्न:
- हुंडीपेटी – ₹64,85,204
- देणगी – ₹63,99,779
- लाडू प्रसाद विक्री – ₹26,21,000
- भक्तनिवास – ₹34,34,708
- पूजा – ₹29,22,100
- रोख दान – ₹25,59,092
- सोने-चांदी अर्पण – ₹1,64,774
- इतर (फोटो, वस्त्रे, शेणखत, गोमुत्र, लॉकर सेवा आदि) – ₹10,68,398
मागील वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ:
गतवर्षी यात्रेच्या काळात काही मर्यादा असूनही 1.26 कोटींचं उत्पन्न झालं होतं. मात्र यंदा तब्बल 1.29 कोटी रुपयांनी वाढ नोंदली गेली आहे.
श्री श्रोत्री यांनी सांगितले की, “या उदंड दानातून भाविकांसाठी सुविधा वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. दर्शनाची व्यवस्था अधिक सुलभ आणि सोयीची करण्यात येईल.