महाराष्ट्राची दक्षिण काशी समजणाऱ्या पंढरीच्या वारीचा सुंगध आता २२ देशांमध्ये दरवळणार आहे. एवढेच नव्हे तर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाची गाथा आता जगभरात पोहोचणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून लंडन येथे भव्यदिव श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभे राहणार आहे. पुढील महिन्यात, एप्रिल २०२५ ते जून २०२५ दरम्यान, पंढरपूर ते लंडन अशी जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दिंडी निघणार आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट हा सांस्कृतिक वारसा जगभरात पोहोचवणे आणि पंढरपूरच्या प्रतिष्ठित सांत गाथेचा प्रसार करणे आहे.श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या लंडन येथे उभारणीसाठी संबंधित टीम खूप प्रयत्नशील आहे. लंडन येथील मंदिराच्या उभारणीसाठी पंढरपूर येथील मंदिर समितीने पूर्ण सहकार्य केले आहे. अनिल खेडकर यांनी या प्रवासासाठी सांगितले की, वारीच्या प्रेम आणि जिव्हाळा याचा लाभ जगभरापर्यंत पोहोचवण्याची प्रामाणिक इच्छा आहे. ही दिंडी सुमारे १८००० किलोमीटरचा प्रवास करत भारताच्या सीमेबाहेर ढकलणार आहे.
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि त्याची वारी ही भारतीय भक्ती परंपरेचे महत्त्वपूर्ण प्रतीक आहे. या परंपरेला आता जागतिक मंचावर स्थान मिळवण्यासाठी एक ऐतिहासिक उपक्रम सुरू झाला आहे. 2025 मध्ये पंढरपूर ते लंडन अशी जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दिंडी निघणार आहे. या दिंडीमध्ये सहभागी होणारे भक्त पंढरपूरच्या पादुका घेऊन 22 देशांमधून 18,000 किलोमीटरचा प्रवास करतील.यामध्ये लंडनमध्ये एक भव्य श्री विठोबा रुक्मिणी मंदिर उभारण्याचा प्रकल्प आहे, जो भारतीय आणि जागतिक भक्तांना या परंपरेचा एक अद्वितीय अनुभव देईल.
या दिंडीमध्ये यूके मधील ४८+ मराठी मंडळे, तसेच जर्मनी, आयर्लंड, आणि अमेरिकेतील मंडळेही सहभागी होत आहेत. तमिळ, कानडी, गुजराथी, तेलगू भाषिक भाविकही या उपक्रमात जोडले जात आहेत. दि. १५ एप्रिल २०२५ रोजी ही दिंडी पंढरपूर येथून सुरू होणार आहे आणि १८ एप्रिल रोजी भारताच्या सीमेबाहेर पडून नेपाळ, चीन, रशिया यांसह २२ देशांचा प्रवास करणार आहे. तिथे विविध भारतीय भाषा बोलणारे भक्त एकत्र येऊन, पंढरपूरच्या संत परंपरेला जागतिक स्तरावर लोकप्रिय करण्यासाठी आपली भूमिका बजावणार आहेत.