34.2 C
New Delhi
Thursday, April 24, 2025
Homeमनोरंजनएमआयटी सांस्कृतिक संध्या संगीत महोत्सवाचे आयोजन

एमआयटी सांस्कृतिक संध्या संगीत महोत्सवाचे आयोजन

उस्ताद नफीसुद्दीन डागर व उस्ताद अनीसुद्दीन डागर यांच्या शुभ हस्ते उद्घाटन

पुणे, : विश्व शांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी, पुणे भारत तर्फे सोमवार दि. ३० व मंगळवार दि. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० ते रात्री १०.१५ वाजेपर्यंत विश्वराज बंधारा, विश्वशांती गुरूकुल, राजबाग, लोणी काळभोर, पुणे येथे ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या ’ संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन दिवस साजरा होणार्‍या या ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सावाचे उद्घाटन दि. ३० डिसेंबर  रोजी सायंकाळी ५.३० वा. उस्ताद नफीसुद्दीन डागर व उस्ताद अनीसुद्दीन डागर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
अत्यंत निसर्गरम्य व सुंदर अशा परिसरात होणार्‍या या संगीत महोत्सवामध्ये उस्ताद नफीसुद्दीन डागर व उस्ताद अनीसुद्दीन डागर यांचे धृपद गायन असेल त्यांना पं. उद्धवबापू आपेगावकर-शिंदे हे पखवाज साथसंगत देतील. तसेच शास्त्रीय गायिका डॉ. श्रेयसी पावगी, ज्येष्ठ व्हायोलिनवादक तेजस उपाध्ये, ज्येष्ठ गायिका कल्याणी बोद्रें हे आपली कला सादर करतील. तसेच भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर विश्वशांती संगीत अकादमीचे विद्यार्थी शिव वंदना आणि गणेशवंदान सादर करतील.
३१ डिसेंबर २०२४ रोजी विश्वशांती संगीत कला अकादमीच्या नृत्यशिक्षिका सौ. आदिती रिसवाडकर यांचे कथ्थक नृत्य सादरीकरण, एमआयटी एडीटीयूचे विद्यार्थी संथाल लोकनृत्य, प्रा. अंकित गुप्ता याचा भक्ती संगीत व हिंदी चित्रपटांचे सुवर्णयथक्ष ह्यावर आधारित संगीतमय कार्यक्रम, प्रा. शशांक दिवेकर यांचे सुगम संगीत गायन, वारकरी संप्रदायातील सुप्रसिद्ध गायिका श्रीमती गोदावरीताई मुंडे यांचे गायन आणि पं. उपेंद्र भट यांचा अभंगवाणी गायनाचा कार्यक्रम होईल.
भारतीय संस्कृती व परंपरेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढी पाडवा हाच खर्‍या अर्थाने  नववर्ष दिन म्हणून साजरा ओळखला जातो. तथापि ३१ डिसेंबर दिवस हा नववर्ष दिनाची पूर्वसंध्या म्हणून वेगळ्याच पाश्चात्य स्वरूपातील जल्लोषात सर्व भारतात व जगातही साजरा केला जातो.
परंतु विश्वशांती केंद्र आळंदी , माईर्स एमआयटी, पुणे आणि विश्वशांती संगीत कला अकादमी, पुणे  या संस्थेच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण समाजामध्ये व विशेष करून तरूण वर्गाच्या मनामध्ये स्वधर्म, स्वाभिमान व स्वत्व जागवून खर्‍या अर्थाने भारतीय अस्मिता जागविण्याचा संस्थेचा एक विनम्र प्रयत्न आहे. एमआयटी सांस्कृतिक संध्येच्या कार्यक्रमातून संगीताच्या साधनेतून ईश्वर दर्शन व शांत रसाची अनुभूती देणारा एक आगळावेगळा अलौकिक आविष्कार सर्व जाणकार रसिकांना मंत्रमुग्ध करेल.
विश्वशांती गुरूकुल येथील विश्वराज बंधार्‍याच्या विस्तीर्ण जलाशयात उभारलेल्या मंदिर स्वरूपी श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी व श्री महाजलदेवता या तीन विशेष मंचावरून शांतरसाची अनुभूती देणारा एमआयटी सांस्कृतिक संध्या हा विशेष कार्यक्रम दरवर्षी ३० ते ३१ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
१ जानेवारी २०२५ रोजी सुरू होणार्‍या नव्या वर्षाची ही अभिनव सुरूवात भारतीय संस्कृतीला अनुसरून नामवंत, तसेच तरूण गायक व संगीतकार यांच्या सादरीकरणातून होणार आहे. एमआयटी सांस्कृतिक संध्येचा समारोप ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री, त्याग व समर्पणाचे प्रतीक असलेल्या यज्ञकुंडामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर, विकार, विकृती व विकल्प सारख्या दुर्गुणांची आहुती देऊन  स्वतःचे आणि संपूर्ण समाजाचे पुढील २०२४ हे वर्ष अत्यंत सुखाने, समाधानाने व शांततेने पार पडावे यासाठी प्रार्थना करून संकल्प सोडला जाईल.
या सांस्कृतिक संध्येच्या कार्यक्रमात सहभागी होऊन नाद ब्रह्म स्वरूपी संगीताच्या साधनेतून ईश्वर दर्शन व शांतरसाची अनुभूती घ्यावी असे विनम्र आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
अशी माहिती विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, विश्वशांती संगीत कला अकादमीच्या कार्यकारी संचालिका सौ. ज्योती कराड ढाकणे आणि महासचिव आदिनाथ मंगेशकर यांनी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
34.2 ° C
34.2 °
34.2 °
10 %
2.2kmh
0 %
Thu
41 °
Fri
42 °
Sat
41 °
Sun
42 °
Mon
41 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!