पुणेः साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा यंदाचा कलादीप पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे आणि कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविली आहे.
साहित्यदीप प्रतिष्ठानच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त बुधवार दिनांक १ मे २०२४ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता, स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, कर्वे रोड, डेक्कन कॉर्नर, पुणे येथे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते हा पुरस्कार भावे यांना प्रदान करण्यात येणार आहे. यानिमित्त सुबोध भावे यांची प्रकट मुलाखात होणार असून प्रसिद्ध कवी डॉ. पं. संदीप अवचट त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. सर्वांसाठी विनामूल्य खुल्या असलेल्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
कलादीप पुरस्कार अभिनेते सुबोध भावे यांना जाहीर
साहित्यदीप प्रतिष्ठान
New Delhi
clear sky
22.1
°
C
22.1
°
22.1
°
24 %
4.6kmh
0 %
Thu
22
°
Fri
24
°
Sat
26
°
Sun
28
°
Mon
29
°