23.3 C
New Delhi
Wednesday, November 12, 2025
Homeमनोरंजनकांटा लगा गर्ल अभिनेत्री शेफाली जरीवालाचा मृत्यू

कांटा लगा गर्ल अभिनेत्री शेफाली जरीवालाचा मृत्यू

Shefali Jariwala Passes Away: मुंबई: हिंदी सिनेइंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कांटा लगा गर्ल शेफाली जरीवाला हिचं कार्डियाक अरेस्टनं निधन झालं आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी तिनं अखेरचा श्वास घेतला. २७ जून रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने तिचे निधन झाले आहे. या घटनेमुळं तिचे कुटुंबिय आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

शेफालीचा पती आणि इतर तीन जणांनी तिला गुरुवारी रात्री रुग्णालयात दाखल केले होते, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. शेफालीच्या निधनाचं वृत्त कळताच सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. शेफाली जरीवालाच्या कुटुंबीयांकडून अधिकृत माहिती अद्याप जाहीर केली नाही. शेफाली लहानपणापासून मिरगी या आजारानं त्रस्त होती. काही महिन्यांपूर्वीच तिनं यासंदर्भात खुलासा केला होता. शेफालीला १५ व्या वर्षी इपिलिप्सी (मिरगीचा)चा पहिला झटका आल्याचं तिनं सांगितलं होतं. इतकंच नाही तर रस्त्यावर चालतानाही तिला इपिलिप्सीचा झटका आल्याचं तिनं सांगितलेलं. त्यामुळं ती सिनेसृष्टीपासून दूर होती.

इतकंच नाही तर शेफाली जरीवाला हिचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिलं होतं.पहिल्या लग्नात तिचा प्रचंड त्रास सहन कराला लागला होता,असं तिनं सांगितलं होतं. पहिलं लग्न झाल्यानंतर तिला मानसिक त्रासातून जावं लागलं होतं, यानंतर काही काळ ती तणावात होती. परंतु दुसऱ्या लग्नानंतर मात्र तिची प्रकृती सुधारली होती. गेल्या काही वर्षात तिला एकदाही इपिलिप्सीचा झटला आला नव्हता, असेही तिने मुलाखतीत सांगितलं होते.

फाली जरीवाला हिनं ‘काँटा लगा’ या गाण्यामुळं विशेष लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर ती ‘बिग बॉस 13′ मध्ये झळकली होती.’बिग बॉस 13’ मध्ये त्यांनी आपल्या खेळण्यानं आणि स्पष्ट बोलण्यानं तिनं प्रेक्षकांची मने जिंकली होती. तिनं अनेक चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केलं होतं.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
23.3 ° C
23.3 °
23.3 °
15 %
2kmh
0 %
Wed
23 °
Thu
28 °
Fri
27 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!