पुणे :
घरातील नोकराणी ही देखील आपल्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटक आहे असे मानले पाहिजे कारण तिच्यामुळेच आपले घर स्वच्छ व नीटनेटके राहते असे ख्यातनाम अभिनेते व दिग्दर्शक स्वप्निल जोशी यांनी सांगितले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सांस्कृतिक कट्टा कार्यक्रमांतर्गत ती बोलत होती यावेळेस पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी, दिग्दर्शक परेश मोकाशी, अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेता सारंग साठे, अभिनेत्री नम्रता संभेराव आणि अभिनेत्री व लेखक मधुगंधा कुलकर्णी उपस्थित होते. महिलाप्रधान चित्रपट म्हणून आणि त्याच्या वेगळ्या विषयामुळे ‘नाच गं घुमा’ कामगार दिनी १ मे २०२४ रोजी प्रदर्शित होत आहे. महिलांभोवती फिरणारी ही कथा असून नामवंत महिला कलाकारांनी ‘नाच गं घुमा’मध्ये अभिनयाची जबाबदारी यशस्वीपणे आपल्या खांद्यावर पेलली आहे. मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या जोडीला सुकन्या कुलकर्णी,सुप्रिया पाठारे, सारंग साठे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत आणि बालकलाकार मायरा वायकुळ या आघाडीच्या आणि नावाजलेल्या कलाकारांच्या चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या संपूर्ण वितरणाची जबाबदारी ‘पॅनोरमा स्टुडीओज’ने स्वीकारली आहे.
जोशी यांनी पुढे सांगितले की, नोकराणी हिला देखील भावना असतात स्वतःच्या कुटुंबातील समस्या दूर करीत स्वतःचे घर सांभाळून ती आपल्या सर्वांचे घर सांभाळत असते. तिला आपल्या घरातील सदस्य म्हणूनच समान वागणूक दिली पाहिजे तिची त्या दृष्टीनेच योग्य ती काळजी घेणे ही आवश्यक आहे.
‘नाच ग घुमा’ या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका असलेल्या संभेराव यांनीही जोशी यांच्या मताशी अनुकूलता दर्शवीत सांगितले,” आम्ही आमच्या चित्रपटांमध्ये नोकरांनी विषयी जे काही दाखवले आहे ते निश्चितपणे लोकांना आवडेल त्यांनाही नोकराणीचे महत्त्व कळेल. या चित्रपटातील माझी भूमिका ही सर्वांना आवडेल अशीच मला खात्री आहे.”
मोकाशी यांनी सांगितले,” स्त्रिया म्हणजे गुणवत्ता आणि भावना यांचे परिपूर्ण मिश्रण आहे. आम्ही या चित्रपटांमध्ये नोकराणीची दिनचर्या दाखवितानाच लोकांचे मनोरंजनही होईल ही काळजी घेतली आहे. या चित्रपटामध्ये आम्ही स्त्रीत्व काय असते हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला खात्री आहे की प्रेक्षकांनाही आमची नोकराणी आवडेल.”