20.1 C
New Delhi
Thursday, February 6, 2025
Homeमनोरंजनज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्तीं यांनान दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. हा पुरस्कार 8 ऑक्टोंबर 2024 रोजी 70 व्या नॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये देण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करत लिहिले आहे की, ‘मला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की, दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीने भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या विशेष योगदानाबद्दल अभिनेते मिथुन चक्रवर्तीजी यांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. हा पुरस्कार 8 ऑक्टोबर 2024 रोजी 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रदान केला जाईल.’

अभिनेतेमिथुन चक्रवर्ती यांनी हिंदी, तमिळ आणि बंगालीसह 350 चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1976 मध्ये आलेल्या’मृगया’ चित्रपटातून त्यांनी करिअरला सुरुवात केली. मिथुन चक्रवर्ती अलीकडच्या काळात’ओह माय गॉड’सारख्या चित्रपटात दिसले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
20.1 ° C
20.1 °
20.1 °
32 %
4.1kmh
0 %
Thu
19 °
Fri
23 °
Sat
26 °
Sun
27 °
Mon
29 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!