24.1 C
New Delhi
Thursday, December 11, 2025
Homeमनोरंजनज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन

 मराठी मालिका, नाटक, सिनेमा अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अडीच वर्षांपासून त्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारत होत्या.

गेल्या आठवड्यापासून त्या आजारी होत्या. ३-४ दिवसांपासून पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही ज्योती चांदेकर यांच्या निधनाच्या बातमीने मराठी सिनेसृष्टीला खूप मोठा धक्का बसला आहे. याशिवाय ‘ठरलं तर मग’ मालिकेतील कलाकारांवर सुद्धा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.चांदेकर यांची मुलगी आहे. आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत अभिनेत्री तेजस्विनी पंडितने या क्षेत्राची वाट धरली. गेल्यावर्षी ‘ठरलं तर मग’ मालिकेत मंगळागौरीचं शूट करताना देखील ज्योती चांदेकर आजारी पडल्या होत्या. त्यावेळी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर जवळपास दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर त्या पुन्हा एकदा मालिकेत परतल्या होत्या

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
24.1 ° C
24.1 °
24.1 °
33 %
3.6kmh
0 %
Thu
24 °
Fri
25 °
Sat
25 °
Sun
25 °
Mon
27 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!