प्रेक्षकांची उत्सुकता वाढली!’तिकळी’ या सन मराठीच्या रहस्याने दडलेल्या मालिकेत आता दिसणार किरण माने,पूजा ठोंबरे, वैष्णवी कल्याणकर आणि पार्थ गाडगे.1 जुलैपासून सोम ते शनि रात्री 10 वाजता ही मालिका आपल्या भेटीला आली आहे.takali_marathi
सन मराठी वाहिनी ही एकापेक्षा एक हटके विषय आपल्या प्रेक्षकवर्गासाठी घेऊन येतच असते त्यातच आता सन मराठी
वाहिनी काहीतरी नवं करू पाहते.कौटुंबिक गोष्ट, सासू सुनेची कथा, प्रेमकथा, या सगळ्या विषयातून प्रेक्षकांचे मनोरंजन करतच असते, पण यंदा सन मराठी वाहिनीने एका वेगळ्या विषयात हाथ घातला आहे.सन मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी मालिकेच्या रूपात एक नवी आणि थरारक कथा घेऊन आले आहेत त्यात या मालिकेच्या प्रोमो ने प्रेक्षकांमध्ये एक वेगळ कुतूहल निर्माण केलं आहे. तिकळी या मालिकेचा जबरदस्त प्रोमो लोक इतकं भरभरून प्रेम देत आहेत, अगदी झपाट्याने हा टिझर वायरल होत असताना लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया कॉमेंट्सद्वारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिकळी या मालिकेचा प्रोमो आऊट झाल्या झाल्या प्रेक्षकांचे या मालिकेप्रती एक वेगळीच उत्सुकता दिसून येत आहेत.
प्रेक्षकांना नेहमी काहीतरी नवं हवंच असतं त्यात आता ही तिकळी कोण ? हिचं रहस्य काय, जीच्यासोबत गावकरी दोन हाथ लांब राहतात, जीचं आयुष्यात असणं म्हणजे आयुष्य बर्बाद होणे, तिकळीला दिसणारी ती व्यक्ती कोण, व त्या व्यक्तीचं नेमकं रहस्य काय अशा सगळ्या गोष्टी या मालिकेतून उलगडीस येणार आहेत.
वैष्णवी कल्याणकर ही अभिनेत्री या मालिकेत तिकळी चे प्रमुख पात्र साकारणार आहे व तिच्या जोडीला अभिनेत्री पूजा ठोंबरे ही गोदा ह्या रहस्मय भूमिकेत असणार आहे. त्याचबरोबर अभिनेता पार्थ घाटगे ‘वेद’ मुख्य पात्र साकारणार आहे.
सध्या ज्या व्यक्तीचा सगळीकडे आवाज आहे आणि ‘तिकळी’ मालिकेच्या विषयासारखाच त्या व्यक्तीचा विषय देखील गंभीर आहे असा कलाकार या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून अभिनेते किरण माने हे आहेत. किरण माने ‘तिकळी’मध्ये ‘बाबाराव’ हे पात्रं साकारणार आहेत.
तिकळीची थरारक अशी रहस्यमय कथा प्रेक्षकांचा भेटीला येणार असून,आता जास्त वाट न पाहता ही मालिका 1 जुलैपासून सोम ते शनि रात्री 10 वाजता फक्त आपल्या सन मराठीवर पाहता येणार आहे.
