मुंबई- मराठी मनोरंजन विश्वामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुप्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झालं आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण कलाविश्वाला धक्का बसला आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी आणि आई असा परिवार आहे. अतुल यांना कर्करोगाने घेरले होते. मात्र या संपूर्ण आजारामधून ते सुखरुप बाहेर पडले होते. पुन्हा त्यांनी अभिनयक्षेत्रात दमदार कमबॅक केलं. कामाला नव्याने सुरुवात करत असताना त्यांच्यावर उपचारही सुरु होते. आज (१४ ऑक्टोबर) अतुल यांच्या निधनाची माहिती समजताच कुटुंबियांवरही दुखाचा डोंगर कोसळला आहे. अतुल परचुरे गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्यावर उपचारदेखील सुरु होते. उपचारानंतर ते बरेदेखील झाले होते.
Our Visitor
0
9
0
6
4
6
Users Today : 165 Total views : 200039