26.1 C
New Delhi
Monday, December 2, 2024
Homeमनोरंजननवी उभारी, उंच भरारी"; 'कलर्स मराठी'चा नवा लूक प्रेक्षकांच्या भेटीला

नवी उभारी, उंच भरारी”; ‘कलर्स मराठी’चा नवा लूक प्रेक्षकांच्या भेटीला

महाराष्ट्राची लाडकी वाहिनी म्हणून ओळखली जाणारी ‘कलर्स मराठी’ वाहिनी आता उंच झेप घेत आहे. रंगात रंग लय भारी… म्हणत कलर्स मराठी आता “नवी उभारी, उंच भरारी” घेणार आहे. महाराष्ट्राचं मूळ, संस्कृती आणि परंपरा आत्मसात करुन भविष्य आणखी उजळ करणं हे नव्या ‘कलर्स मराठी’चं पहिलं पाऊल असणार आहे. परंपरा जपत, नवीन बदलाचा मार्ग धरणारा आपला महाराष्ट्र जगात प्रोग्रेसिव्ह म्हणून प्रसिद्ध आहे. अशा महाराष्ट्राच्या भारी मनोरंजनासाठी सज्ज झालं आहे आपलं ‘कलर्स मराठी’.. ‘बिग बॉस मराठी’च्या या भन्नाट सीझनपासून सुरू झालेल्या या प्रवासातलं पुढचं पाऊल आहे, कलर्स मराठीचा नवीन लूक. महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश देशमुख हा सीझन होस्ट करत असून त्याचा कल्ला प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. टीआरपी रेटिंगवर होत असलेला वर्षाव याची कबुली देतो. आधुनिकतेसह परंपरेची सांगड घालण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तमरित्या करण्यात आला आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या नुकत्याच समोर आलेल्या भागात रितेश देशमुखने ‘कलर्स मराठी’च्या नव्या लूकचं अनावरण केलं आहे. ‘कलर्स मराठी’च्या नव्या लूकमध्ये आपल्या मराठी मातीचा गंध आहे, आत्मविश्वासाचा रंग आहे.. परंपरेची साथ आहे आणि नवीन उद्याची बात आहे.. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाळावर असलेल्या चंद्रकोरीतून मिळालेला संस्कारांचा आदर्श आहे.. तर मराठमोळं रूप खुलवणाऱ्या, आपल्या माता भगिनींच्या कपाळी सजलेल्या चंद्रकोरीचं सौंदर्य आणि पावित्र्य.. या नव्या जोशात नव्या मनोरंजनाची अनेक नवीन दालनं लवकरच उघडणार आहेत तुमच्यासाठी फक्त आपल्या ‘कलर्स मराठी’वर.’कलर्स मराठी’वरील नवे कार्यक्रम आणि रोमांचक मालिका आता नव्या प्रेक्षकांना आकर्षित करतील. चंद्रकोर चतुर्थीचंदेखील प्रतिनिधित्व करते. सर्व अडथळे दूर करण्यास चंद्रकोर महत्त्वाची आहे. ‘कलर्स मराठी’च्या प्रवासाचा नवा अध्याय आता सुरू होत आहे. स्वच्छ, नितळ, सुंदर अशा श्रावणातल्या पावसाप्रमाणेच ‘कलर्स मराठी’चा नवा लूकदेखील एकदम फ्रेश आहे.

‘कलर्स मराठी’चे प्रोग्रॅमिंग हेड केदार शिंदे म्हणाले,”कलर्स मराठी’ने आजवर मराठी संस्कृती आणि परंपरा सातत्याने जपली आहे. आता ‘नवी उभारी, उंच भरारी’ घेत आणखी उत्तम काम करताना आनंद होत आहे. आमच्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. मला खात्री आहे की, हे धाडसी पाऊल प्रेक्षकवर्गात आणखी वाढ करण्यास मदत करेल आणि आम्हाला आणखी यश मिळेल. मनोरंजनविश्वात नव्या कलर्स मराठीला बळकट करण्यास ही नवी सुरुवात नक्कीच मदत करेल”.

‘कलर्स मराठी’वर येत्या काही दिवसांत अनेक नव-नव्या मालिका पाहायला मिळणार आहेत. या मालिका प्रेक्षकांना उमेद देणाऱ्या ठरतील. ‘दुर्गा’ आणि ‘आई तुळजाभवानी’ या आगामी मालिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. ‘दुर्गा’ या मालिकेत जोडीदाराच्या प्रेमातून शत्रूच्या सुडाची आग उमलणार आहे. तर भक्तांच्या हाकेला त्वरित धाऊन येणारी, स्वराज्य रक्षिण्या तळपती तलवार भेट देणारी ‘आई भवानी’, अवघ्या महाराष्ट्राची ‘कुलस्वामिनी’ अर्थात ‘आई तुळजाभवानी’ लवकरच प्रेक्षकांना आपल्या लाडक्या ‘कलर्स मराठी’वर पाहायला मिळणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
26.1 ° C
26.1 °
26.1 °
34 %
2.6kmh
0 %
Mon
26 °
Tue
28 °
Wed
27 °
Thu
26 °
Fri
26 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!