19.1 C
New Delhi
Saturday, October 25, 2025
Homeमनोरंजनमकर संक्रातीच्या दिवशी रंगणार ‘तालचक्र’ संगीत महोत्सव

मकर संक्रातीच्या दिवशी रंगणार ‘तालचक्र’ संगीत महोत्सव

यंदा महोत्सवाचे १२ वे वर्ष, महोत्सवास प्रवेश विनामूल्य

पुणे, : तालवाद्यांना केंद्रस्थानी ठेवून सुरु करण्यात आलेला आणि प्रसिद्ध तबलावादक पद्मश्री विजय घाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘तालचक्र’ हा संगीत महोत्सव मंगळवार दिनांक, १४ जानेवारी २०२५ रोजी म्हणजे संक्रातीच्या दिवशी संध्याकाळी ६:०० वाजता डी. पी. रस्त्यावरील पंडित फार्म्स येथे आयोजित केला जाणार आहे. महोत्सवाचे हे  १२ वे वर्ष असून दर वर्षीप्रमाणे या वर्षीही रसिक प्रेक्षकांना नावाजलेल्या दिग्गजांचे सादरीकरण अनुभवायला मिळेल. या वर्षीचा महोत्सव निशुल्क असून महोत्सवाच्या मोफत प्रवेशिका तिकीट खिडकी या संकेत स्थळावर उपलब्ध असल्याची माहिती महोत्सवाचे आयोजक पद्मश्री विजय घाटे यांनी दिली.

तालचक्र महोत्सवामध्ये अनेक नावाजलेल्या कलाकारांचे सादरीकरण होईल ज्यामध्ये हिंदुस्तानी संगीत शैलीच्या ढंगाने केलेल्या बासरीवादनासाठी ख्यातनाम असलेले बासरीवादक, राकेश चौरासिया यांचे बासरी वादन, दक्षिण भारतीय खंजरीवादक सेल्व्हा गणेश यांचे वादन, नितीन शंकर यांचे तालवादय वादन, नवीन शर्मा यांचे ढोलक वादन, निलेश परब यांचे ढोलकी वादन, अनंत यांचे मृदंगम वादन, शिखर नाद कुरेशी यांचे जेंबे, सुरंजन खंडाळकर यांचे गायन, अभिषेक शिनकर यांचे हार्मोनियम वादन, शीतल कोलवलकर यांचे कथक सादरीकरण आणि पद्मश्री पंडित विजय घाटे यांचे तबला वादनाची पर्वणी रसिकांना मिळणार आहे.      

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
19.1 ° C
19.1 °
19.1 °
82 %
0kmh
0 %
Sat
32 °
Sun
33 °
Mon
32 °
Tue
32 °
Wed
30 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!