22.1 C
New Delhi
Thursday, February 6, 2025
Homeमनोरंजनमहाराष्ट्राच्या भीषण परिस्थितीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या 'पाणी'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

महाराष्ट्राच्या भीषण परिस्थितीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या ‘पाणी’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

प्रियांका चोप्रा जोनस, राजश्री एंटरटेन्मेंट आणि कोठारे व्हिजनचा ‘पाणी’ चित्रपट १८ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित

मुंबई- राजश्री एंटरटेन्मेंट आणि पर्पल पेबल पिक्चर्स, कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत ‘पाणी’ हा महाराष्ट्रातील पाणीटंचाईच्या भीषण परिस्थितीवर भाष्य करणारा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या टीझरवर प्रेक्षकांच्या कौतुकाचा वर्षाव होत असतानाच आता या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर झळकला आहे. मराठवाड्यातील पाणीटंचाई सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या तरुणाची संघर्षगाथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.या ‘जलदूता’ची म्हणजेच हनुमंत केंद्रे यांची भूमिका आदिनाथ कोठारे याने साकारली असून या चित्रपटात रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे लिखित या चित्रपटाचे दिग्दर्शनही आदिनाथ कोठारे यानेच केले आहे. तर नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॅा. मधू चोप्रा या चित्रपटाचे निर्माते असून महेश कोठारे, सिद्धार्थ चोप्रा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत.या चित्रपटात मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात हनुमंत केंद्रे यांचे इतिहास घडवणारे कार्य आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाणी प्रश्नांमुळे गावातील अनेक कुटुंबे गाव सोडून जात असतानाच या तरुणाने गावातच राहून या प्रश्नावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. गावात पाणी नसल्याने त्याचे लग्नही होत नसल्याचे ट्रेलरमध्ये दिसतेय. त्यामुळे आता गावात पाणी आणण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या या तरुणाचा हा प्रवास कसा असणार, गावात पाणी येणार का? ज्या तरुणीवर त्याचे प्रेम आहे तिच्याशीच लग्न होणार का ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला १८ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात मिळणार आहेत.चित्रपटाचे दिग्दर्शक आदिनाथ कोठारे म्हणतो, ” हा आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. माझ्या या प्रवासाचा भाग असलेल्या प्रत्येकाचा मी आभारी आहे. लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता हे तिहेरी भूमिका साकारणे आव्हानात्मक होते परंतु या सगळ्याची प्रोसेस कमाल होती. खूप काही शिकवणारी होती. मला विश्वास आहे की, प्रेक्षकांना हा चित्रपट आवडेल. ‘पाणी’च्या माध्यमातून, आम्ही काही लोकांमध्ये पाणी टंचाईबद्दल जागरूकता निर्माण करण्यात यशस्वी झालो, तरी आम्हाला त्याचा आनंद होईल. आमच्या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकला आपला आवाज देणारे गायक शंकर महादेवन आणि चित्रपटाला सहाय्य करणाऱ्या आमिर खान प्रॉडक्शन्सचेही आम्ही कायम आभारी आहोत.’’

चित्रपटाबद्दल पर्पल पेबल पिक्चर्सची संस्थापक आणि प्रवर्तक प्रियांका चोप्रा जोनस म्हणते, ” हा एक असा सामाजिक विषय आहे, तो जगभरात पोहोचणे, अतिशय महत्वाचे आहे आणि असा विषय घेऊन आम्ही येतोय, याचा विशेष आनंद आहे. अनोख्या आणि प्रादेशिक भाषेतील चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो. ‘पाणी’ हा त्यातीलच चित्रपट आहे. खूप चांगल्या पद्धतीने या चित्रपटाची रचना करण्यात आली आहे. या चित्रपटाची टीमही उत्कृष्ट आहे. ‘पाणी’साठी प्रेक्षक जेवढे उत्सुक आहेत, तितकीच मी सुद्धा आहे.”

राजश्री एंटरटेन्मेंटच्या नेहा बडजात्या म्हणतात, ” हा आमचा पहिला मराठी चित्रपट आहे आणि या इंडस्ट्रीत आमचा पहिला ठसा उमटवण्यासाठी ‘पाणी’ यापेक्षा आणखी चांगला चित्रपट कोणता आहे? पर्पल पेबल पिक्चर्स, कोठारे व्हिजन यांसारख्या नावाजलेल्यासोबत एकत्र येऊन काम करणे, माझ्यासाठी एक मोठी संधीच आहे. चित्रपटाची कथा, बांधणी, कलाकार आणि इतर तंत्रज्ञ या सगळ्याच गोष्टींचा ताळमेळ उत्तमरित्या जुळून आल्याने पदार्पणातच एक उत्तम कलाकृती घेऊन येत असल्याचे समाधान आहे.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
22.1 ° C
22.1 °
22.1 °
24 %
4.6kmh
0 %
Thu
22 °
Fri
24 °
Sat
26 °
Sun
28 °
Mon
29 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!