18.1 C
New Delhi
Tuesday, November 4, 2025
Homeमनोरंजनलावणीचा लोकनाट्याच्या चळवळीत मोठा वाटा - भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे...

लावणीचा लोकनाट्याच्या चळवळीत मोठा वाटा – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मत

भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ , महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा प्रिया बेर्डे यांच्या वतीने सांस्कृतिक कला व लावणी महोत्सवाचे आयोजन

पुणे : गीत, नृत्य, अभिनय या तिन्हींचा उत्तम संगम म्हणजे लावणी. गेल्या काही वर्षांपासून लावणीला जागतिक स्तरावर ओळख, मान -सन्मान मिळत आहे. महाराष्ट्राची ही लोककला एका वेगळ्या उंचीवर पोहोचलेली आहे. लावणीला लोककलेच्या क्षेत्रात मानाचे स्थान आहे. तसेच लावणीचा लोकनाट्याच्या चळवळीत मोठा वाटा आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने सांस्कृतिक कला व लावणी महोत्सवाचे आज आयोजन करण्यात आले होते. यावेळी बावनकुळे बोलत होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह,सातारा रोड, पद्मावती, येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला महामंत्री विक्रांत पाटील, आमदार सदाभाऊ खोत, आमदार अमित गोरखे, आमदार भीमराव तापकीर, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिपकभाऊ मानकर,माजी आमदार जगदीश मुळीक, माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, श्रीनाथ भीमाले, वर्षा तापकीर ,अमृता मारणे, अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अभिनेत्री सुरेखा कुडची, मेघा घाडगे, नितीन वाबळे, रूपाली धाडवे, महोत्सवाच्या आयोजक, भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षा अभिनेत्री प्रिया बेर्डे स्वागतोस्तुक सोनू मारुती चव्हाण, महेश भांबीड, विद्या पोकळे पाटील, शहाराध्यक्ष जतीन पांडे, धनंजय वाठारकर आणि संस्कृतिक प्रकोष्ठ चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कलावंत म्हणजे मनोरंजन आणि सांस्कृतिक ओळख जपणारा कार्यकर्ता. कलेचा संगम आणि विचाराचा देणं देण्याचं काम कलाकार करत असतो. कलावंतांमुळेच हे जग सुंदर आहे. महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी त्या काळी क्रांती केली आपल्या कलेच्या माध्यमातून एक समाज जागृती च काम केलं राष्ट्रनिर्मितीचं काम केलं. त्याप्रमाणे आज मुंबई असेल कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र विदर्भ किंवा मराठवाडा असेल त्या त्या भागातील कलागुणांना एकत्र करून एक सांस्कृतिक महाराष्ट्र निर्मितीचे काम करणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
18.1 ° C
18.1 °
18.1 °
77 %
0kmh
7 %
Tue
30 °
Wed
31 °
Thu
29 °
Fri
29 °
Sat
27 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!