20.1 C
New Delhi
Wednesday, November 12, 2025
Homeमनोरंजन२५ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार 'नाद

२५ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार ‘नाद

घोषणा झाल्यापासून ‘नाद – द हार्ड लव्ह’ हा मराठी चित्रपट सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. दिमाखदार संगीत प्रकाशन सोहळ्यानंतर या चित्रपटाचा लक्षवेधी टिझर रसिकांच्या भेटीला आला आहे. ‘नाद’चा टिझर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे. खऱ्या अर्थाने चित्रपटाची झलक दाखवणारा टिझर ‘नाद’मध्ये प्रेक्षकांना एक संगीतमय प्रेमकथा पाहायला मिळणार असल्याचे संकेत देतो. चित्रपटाच्या शीर्षकासोबत असलेल्या ‘द हार्ड लव्ह’ या टॅगलाईनप्रमाणेच टिझरही हार्ड झाला आहे. ‘नाद’ हा चित्रपट २५ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकरच्या बॅनरखाली निर्माते संजय पगारे आणि रुपेश दिनकर यांनी ‘नाद – द हार्ड लव्ह’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. रुपाली दिपक पवार आणि वैशाली नितीन पवार या चित्रपटाचे निर्मिती व्यवस्थापक आहेत. ‘नाद’चं दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलं आहे. टिझरची सुरुवातच मूळात ‘नाद’ची व्याख्या सांगणारी आहे. गावाकडच्या लाल मातीतून नागमोडी वाट काढत जाणारा काळाभोर डांबरी रस्ता आणि त्यावर बुलेटची सवारी करणारा नायक लक्ष वेधून घेतो. दुसरीकडे शीर्षकाची व्याख्या उलगडत जाते. ‘नाद’ म्हणजेच ध्यास जेव्हा श्वासातून रक्तात उतरतो, तेव्हा काय होतं ते टिझरमध्ये सांगितलं आहे. थोडक्यात काय तर गावाकडच्या लाल मातीत, हिरवा शालू नेसलेल्या शेतात रंगलेली रांगडी प्रेमकथा ‘नाद’मध्ये पाहायला मिळणार असल्याचं टिझर पाहिल्यावर जाणवतं. टिझरला देण्यात आलेली काव्यात्मक संवादांची जोड तो अधिकच खुलवण्यास मदत करते. खळखळ वाहणारी नदी, नदी किनारी असलेले मोठाले खडक आणि त्यावर बसून रोमान्स करणारी नायक-नायिकेची गुलाबी जोडीही यात आहे. प्रेम हा शब्द लिहायला, वाचायला, म्हणायला जरी सोपा असला तरी प्रेम झाल्यावर किती आव्हानांना सामोरं जावं लागतं त्याची झलकही यात आहे. गुलाबी प्रेमाच्या या रक्तरंजित कहाणीमध्ये हाणामारीही पाहायला मिळणार आहे. सुरेल गीत-संगीत ही या चित्रपटाची जमेची बाजू ठरणार आहे. ‘नाद’चा टिझर सर्वार्थाने चित्रपटाचा चेहरा ठरणारा असल्याचे दिग्दर्शक प्रकाश पवार यांचे म्हणणे आहे.

‘नाद’ची कथा संतोष दाभोळकर आणि दिपक पवार यांनी, तर पटकथा व संवादलेखन डॉ. विनायक पवार यांनी केलं आहे. वैभव देशमुख यांच्या साथीने विनायक पवार यांनी गीतलेखनही केलं असून ही सर्व गाणी संगीतकार पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केली आहेत. ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड आणि सपना माने या नव्या कोऱ्या जोडीची अनोखी केमिस्ट्री या चित्रपटात रसिकांना भुरळ पाडणार आहे. याखेरीज यशराज डिंबळे, तानाजी गालगुंडे, किरण माने, विजय पाटकर, जयवंत वाडकर, कमलेश सावंत, सूरज पवार, विनायक पवार, श्रीकांत गायकवाड, गणेश पदमाळे, आशिष वारंग आदी कलाकारांनीही या चित्रपटामध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. डिओपी अमित सिंह यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, सतीश चिपकर यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. सिद्धेश दळवीने कोरिओग्राफी, तर निगार शेख यांनी वेशभूषा केली आहे. सुजित मुकटे कार्यकारी निर्माते असून आमिरा शेख क्रिएटिव्ह हेड आहेत. रमेश शेट्टी या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर असून संकेत चव्हाण लाइन प्रोड्युसर आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
20.1 ° C
20.1 °
20.1 °
52 %
1kmh
0 %
Wed
25 °
Thu
28 °
Fri
27 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!