14.1 C
New Delhi
Friday, December 12, 2025
Homeमनोरंजनप्रसिद्ध अभिनेते अमोल बावडेकरांना हृदयविकाराचा झटका!

प्रसिद्ध अभिनेते अमोल बावडेकरांना हृदयविकाराचा झटका!

Amol Bawdekar Heart Attack | प्रसिद्ध रंगभूमी आणि टेलिव्हिजन अभिनेते अमोल बावडेकर (Amol Bawdekar Heart Attack) यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे रविवारी सकाळी मुंबईतील विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात ‘सुंदर मी होणार’ या नाटकाचा प्रयोग रद्द करण्याचा निर्णय नाटकाच्या निर्मात्यांनी घेतला. बावडेकर या नाटकात महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. शनिवारी त्यांनी वाशीमध्ये नाटकाचा प्रयोग केला, त्यानंतर त्यांना रविवारी सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अभिनेते अमोल बावडेकर यांच्यावर अँजिओग्राफी (Angiography) करण्यात आली असून, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र, प्रकृती ठीक नसतानाही नाटकाचा प्रयोग पूर्ण करू देण्याची बावडेकर यांची विनंती ही त्यांच्या कलेप्रती असलेले असीम प्रेम आणि समर्पण अधोरेखित करते.

‘सुंदर मी होणार’ या नाटकाला रंगभूमीवर चांगला प्रतिसाद मिळत असून, या नाटकाचे विविध ठिकाणी प्रयोग यशस्वीपणे झाले आहेत. शनिवारी या नाटकाचा प्रयोग वाशीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. अमोल बावडेकर यांना अस्वस्थ वाटत होते, तरीही त्यांनी नाटकाचा प्रयोग पूर्ण केला. (Amol Bawdekar Heart Attack)

या नाटकानंतर लगेचच जोडून दुसऱ्या दिवशी, म्हणजेच रविवारी, पार्ल्यातील दीनानाथ नाट्यगृहात ‘सुंदर मी होणार’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी अमोल बावडेकरांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्यामुळे नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला. (Amol Bawdekar Heart Attack)

निर्मात्यांनी रविवारीच्या प्रयोगासाठी तिकिटे घेतलेल्या प्रेक्षकांना त्यांच्या तिकिटाचे पैसे परत केले आहेत. आता या नाटकात अमोल बावडेकर यांच्या जागी अभिनेता अनिरुद्ध जोशी ही भूमिका साकारणार आहे, अशी माहिती नाटकाचे दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी दिली आहे. अमोल बावडेकर यांच्या लवकर बरे होण्यासाठी चाहत्यांकडून आणि नाट्यवर्तुळातून प्रार्थना केली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
14.1 ° C
14.1 °
14.1 °
72 %
0kmh
0 %
Thu
19 °
Fri
25 °
Sat
25 °
Sun
25 °
Mon
27 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!