20.1 C
New Delhi
Monday, November 10, 2025
Homeमनोरंजन२१ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार “स्मार्ट सुनबाई”

२१ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार “स्मार्ट सुनबाई”

पुणे : हस्य, हास्य आणि भावबंधांचा मेळ साधणारा नवा धमाल मराठी सिनेमा “स्मार्ट सुनबाई” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे, गार्गी निर्मित तर कार्तिक दोलताडे पाटील सहनिर्मित हा चित्रपट २१ नोव्हेंबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जबरदस्त पोस्टरने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. काही कलाकार शहरी तर काही ग्रामीण लुकमध्ये झळकले असून कथेत नक्की कोणती गूढता दडलेली आहे, हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे.

या चित्रपटात रोहन पाटील, संतोष जुवेकर, भाऊ कदम, मोहन जोशी, दीपक शिर्के, अंशुमन विचारे, सायली देवधर, प्राजक्ता गायकवाड, किशोरी शहाणे, उषा नाईक यांसारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सांगितले की, “प्रत्येक सुनेला स्मार्ट सुनबाई होण्यासाठी हा चित्रपट प्रेरणादायी ठरेल.”

चित्रपटाची कथा आणि लेखन योगेश शिरसाट यांनी केले असून संगीत विजय नारायण गवंडे व साई-पियुष यांचे आहे. गीतांना वैभव देशमुख आणि अदिती द्रविड यांचे शब्द लाभले आहेत तर अजय गोगावले, वैशाली माढे, सावनी रवींद्र यांसारख्या दिग्गज गायकांचे स्वर या चित्रपटात झळकणार आहेत.

प्रेक्षकांच्या मनात औत्सुक्याची लाट निर्माण करणारा हा सिनेमा २१ नोव्हेंबरपासून मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
20.1 ° C
20.1 °
20.1 °
56 %
0kmh
0 %
Mon
25 °
Tue
28 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!