21.8 C
New Delhi
Friday, November 7, 2025
Homeमनोरंजनसुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचं दहा वर्षांनंतर स्टार प्रवाहवर दमदार पुनरागमन

सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचं दहा वर्षांनंतर स्टार प्रवाहवर दमदार पुनरागमन

स्टार प्रवाहच्या काजळमाया मालिकेत साकारणार चेटकीणीची व्यक्तिरेखा

आपल्या दमदार अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री प्रिया बेर्डे यांना आपण अनेक कलाकृतींच्या माध्यमातून भेटत आलोय. प्रिया बेर्डे यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांना एक नवी अनुभूती मिळालीय. स्टार प्रवाहच्या काजळमाया मालिकेतून कनकदत्ताच्या रुपात त्या पुन्हा एकदा मालिका विश्व गाजवण्यासाठी सज्ज आहेत.

चेटकीण वंशामधील विलक्षण सुंदर असलेल्या आणि तंत्रविद्येत प्रविण असलेल्या पर्णिका नावाच्या चेटकीणीची गोष्ट म्हणजेच काजळमाया ही मालिका. रुपाने सुंदर असलेली पर्णिका कमालीची स्वार्थी, निर्दयी आणि संधीसाधू आहे. चेटकीण वंश वाढवण्याचं एकमेव ध्येय तिच्या डोळ्यांसमोर आहे आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. कनकदत्ता ही पर्णिकाची आई. सुडाच्या भावनेने पेटलेली, अत्यंत खुनशी आणि मोठे डोळे आणि आपल्या चेटकीण मुलीबद्दल अभिमान बाळगणारी. कनकदत्ताची आपल्या मुलीने म्हणजेच पर्णिकाने चेटकीण वंश पुढे वाढवावा एवढीच इच्छा आहे. याच हेतूने ती पर्णिकाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेला खत पाणी घालते. कनकदत्ता आणि पर्णिका आपलं ध्येय पूर्ण करण्यात यशस्वी ठरणार का याची उत्कंठावर्धक गोष्ट काजळमाया मालिकेतून पाहायला मिळेल.

कनकदत्ता या भूमिकेविषयी सांगताना प्रिया बेर्डे म्हणाल्या,’माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात अश्या पद्धतीची भूमिका मी कधीही साकारलेली नाही. कनकदत्ताला पहाता क्षणीच धडकी भरते. ती बेमालूमपणे वेषांतर करते. तिला संमोहन विद्या अवगत आहे. अनेक कंगोरे आहेत या भूमिकेला. प्रेक्षकांना नक्की आवडेल याची खात्री आहे. तेव्हा पाहायला विसरु नका नवी गूढ मालिका काजळमाया २७ ऑक्टोबरपासून रात्री १०. ३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
21.8 ° C
21.8 °
21.8 °
14 %
2.7kmh
0 %
Fri
29 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
26 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!