15.1 C
New Delhi
Monday, November 10, 2025
Homeमनोरंजनलोकप्रिय अभिनेते "प्रशांत दामले" यांचा विक्रमी 13333 वा प्रयोग !

लोकप्रिय अभिनेते “प्रशांत दामले” यांचा विक्रमी 13333 वा प्रयोग !

16 नोव्हेंबर ला होणार - ना. चंद्रकांत पाटील

प्रशांत दामले हे “नट” म्हणून आणि “माणूस” म्हणून ही श्रेष्ठ – त्यांचे समाज कार्य उल्लेखनीय – संदीप खर्डेकर

“कोथरूड नवरात्र उत्सवात क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे विविध संस्थांना लोकोपयोगी वस्तू भेट”

प्रशांत दामले हे अत्यंत लोकप्रिय अभिनेते असून 16 नोव्हेंबर ला त्यांचा विक्रमी असा 13333 वा नाट्य प्रयोग सादर होईल त्यासाठी आपली तारीख राखून ठेवा असे आवाहन ना. चंद्रकांत पाटील यांनी केले.


क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान आयोजित कोथरूड नवरात्र महोत्सवात ” शिकायला गेलो एक” ह्या अफलातून विनोदी नाटकाच्या मोफत प्रयोगाच्या वेळी प्रशांत दामले यांचा पुणेरी पगडी, शाल व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रंगमंचावर राज्यमंत्री ना. माधुरीताई मिसाळ, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, मा. नगरसेविका व शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर, कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विशाल भेलके,सौ. श्वेताली भेलके,सांस्कृतिक महोत्सवाचे संयोजक उमेश भेलके,सौ. अक्षदा भेलके,कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, कोथरूड मध्य चे भाजपा मंडल अध्यक्ष निलेशजी कोंढाळकर, क्रिएटिव्ह फौंडेशन चे विश्वस्त प्रतीक खर्डेकर,सौ. कल्याणी खर्डेकर व इतर मान्यवर उपस्थित होते. क्रिएटिव्ह फाउंडेशन चे कार्य गौरवास्पद असून मी संदीप खर्डेकर यांची वाटचाल व त्यांचे कार्य गेली 35 वर्षे बघत आली आहे असे ना. माधुरीताई मिसाळ म्हणाल्या.नवरात्रीतच नव्हे तर कायमच स्त्री शक्ती चा सन्मान केला पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
यावेळी चंद्रकांतदादा करत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल एक संवेदनशील नेतृत्व म्हणून त्यांचा विशाल भेलके, उमेश भेलके व प्रतीक खर्डेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सन्मान करण्यात आला तर संघर्षातून उभं राहिलेलं नेतृत्व म्हणून ना. माधुरीताई मिसाळ यांचा सौ. मंजुश्री खर्डेकर, सौ. श्वेताली भेलके व सौ. अक्षदा भेलके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने श्रमदान मारुती मंडळ ग्रंथालयास अजय कोंढरे व मोहनीश सावंत यांना अकरा हजाराची मदत देण्यात आली, तसेच कुंबरे गार्डन गणेशोत्सव मंडळाचे ऋषिकेश कुंबरे व स्वर्गीय रखमाबाई ताडगे प्रतिष्ठान चे अध्यक्ष अनिल ताडगे यांना स्पीकर सेट भेट देण्यात आली.बाहेर मुसळधार पाऊस आणि
तुडुंब भरलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ” शिकायला गेलो एक ” च्या प्रयोगात हास्याचा धबधबा कोसळत होता असे संयोजक संदीप खर्डेकर म्हणाले. अश्या पावसात देखील कोथरूडकर सर्व कार्यक्रमांना गर्दी करत आहेत यावरूनच दर्दी प्रेक्षकांची पारख होते असेही खर्डेकर म्हणाले. यापुढील काळात अधिक व्यापक स्वरूपात सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करणार असल्याचे मंजुश्री खर्डेकर, श्वेताली भेलके व अक्षदा भेलके यांनी जाहीर केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
15.1 ° C
15.1 °
15.1 °
82 %
0kmh
0 %
Mon
23 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!