चिंचवड- राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी असा जयघोष करत युनिक व्हिजन इंग्लिश मिडियम स्कूलschool च्या प्रांगणात कार्यक्रमास सुरुवात केली. ३५० वर्ष जुनी दिंडी परंपरा समजण्यासाठी नर्सरी, प्रायमरी, १ ली ते १० वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी हरिनामाच्या जयघोषात माऊलीच्या पाद्यपूजनाने आनंदवारीला उत्साहात सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम, संत गोराकुंभार,पुंडलिक तसेच निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशा विविध संत व वारकरी वेशभूषा केल्या व आपल्या संत पंरपरेचा वारसा जपला. Wari

शाळेच्या इ १ वी ते १० वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी धान्य जमा करून “ जिव्हाळा बालसंगोपन केंद्र “ काळेवाडी kalewadi याठिकाणी भेट स्वरुपात दिले. व अनाथाचा नाथ पाडूरंग हा उपक्रम राबविला. इ.३री व इ.४ थी च्या विद्यार्थ्यांनी पालखी रिंगण साजरे केले. यावेळी शाळेच्या संचालिका अश्विनीताई चिंचवडे chinchwade यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन guidence व आषाढी एकादशीचे महत्व सांगितले.
सौ.प्रियांका गोडसे, सौ.सरिता राहाटे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी शाळेच्या संचालिका अश्विनीताई चिंचवडे, मुख्याध्यापिका सौ. रजनी दुवेदी, अध्यक्ष ऋषीकेश चिंचवडे सर, केंद्र अधीक्षक सतीश खेडकर सर तसेच सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी सहभागी झाले होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.