17.1 C
New Delhi
Saturday, January 17, 2026
Homeमहाराष्ट्रआकुर्डीमध्ये सुलक्षणा शिलवंत यांच्या पदयात्रेला लोटला जनसागर

आकुर्डीमध्ये सुलक्षणा शिलवंत यांच्या पदयात्रेला लोटला जनसागर

जोरदार शक्ती प्रदर्शन

पिंपरी :- राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी या जयघोषात आकुर्डी परिसरातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत धर यांच्या प्रचारासाठी जनसागर लोटला होता. या प्रचंड जनसागरामुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही जवळपास एकतर्फी होणार व महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत प्रचंड बहुमताने विजयी होणार याच्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

पिंपरी विधानसभा निवडणूक निमित्ताने आकुर्डी दत्तवाडी, विठ्ठलवाडी, क्रांतीनगर, श्रीकृष्ण नगर, एकतानागर, पंचारानगर, गुरुदेवनगर, आकुर्डी गावठाण या भागात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत धर यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. सुलक्षणा शिलवंत धर यांच्या प्रचारार्थ आकुर्डी परिसरात गाठीभेटी व भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेला लोटलेली अभुतपुर्व गर्दी पाहता या प्रभागात शिलवंत यांनी जोरदार आघाडी घेतल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.

शिलवंत यांच्या प्रचारार्थ आकुर्डी पहिल्या सत्रात येथे सकाळ पासून गाठीभेटी घेण्यास सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी या ठिकाणी गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे चिन्ह असलेले उपरणे, हातामध्ये तुतारी चिन्ह असलेले फलक, उमेदवारांचे छायाचित्र असलेले फलक घेऊन कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करून वातावरण ढवळून काढत होते. यामध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती. ताशाच्या तडतडाटाने या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वारे शिरलेले पाहायला मिळाले. दुपारी १२ वाजता आकुर्डी येथील ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिर येथे श्रीफळ वाहून भव्य पद यात्रेला सुरुवात करण्यात आली.

महाविकास आघाडीचे उमेदवार सुलक्षणा शिलवंत धर यांच्या सह, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, माजी नगरसेवक गिरीश कुटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे इखलास सय्यद, तौहीद जावेद शेख, संदीप चव्हाण, पिंपरी विधानसभा कार्याध्यक्ष राजेंद्र कदम, सागर लक्षरे, साहूल हमीद शेख, वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप पानसरे  टाटा मोटर्सचे युनियन माजी कार्याध्यक्ष अशोक माने, पश्चिम महाराष्ट्र युवा नेते अशोक पाटील, अमोल निकम, शिवसेना उपशहरप्रमूख, वैभवीताई घोडके, शहर समन्वयक पार्थ गुरव, विभागप्रमुख विकास भिसे, प्रदीप महाजन, भाविक देशमुख, जिब्राईल शेख, सुनील मोरे, सुरज मोरे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अमीन शेख, अभिजित सोनके, ऋषिकेश घोरपडे, आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अण्णा कुऱ्हाडे, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्षा मीनाताई जावळे, चेतन बेंद्रे, चंद्रमानी जावळे, सतीश सिलम, काँग्रेसचे राहुल शिंपले, वहाब शेख, सुनीता पवार, सर्व पक्षांचे आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
17.1 ° C
17.1 °
17.1 °
67 %
1.5kmh
100 %
Sat
18 °
Sun
24 °
Mon
25 °
Tue
24 °
Wed
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!