18.1 C
New Delhi
Sunday, December 1, 2024
Homeमहाराष्ट्रआरोग्यसंपन्न भारताकरिता अतिरुद्र महायाग

आरोग्यसंपन्न भारताकरिता अतिरुद्र महायाग

वेदमूर्ती नटराजशास्त्री यांसह ६५ ब्रह्मवृंदांचा सहभाग

पुणे : रुद्र होम, महा सुदर्शन होम, संतान गोपाल कृष्ण होम यांसह विष्णू सहस्त्रनाम अर्चना, गणेश याग, मेधा दक्षिणा मूर्ती होम, स्वयंवर पार्वती होमासह विविध प्रकारच्या धार्मिक विधींनी एकवीस दिवसीय अतिरुद्र महायागाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात प्रारंभ झाला. जगाच्या कल्याणाकरिता आणि आरोग्यसंपन्न भारताकरिता तब्बल ६५ ब्रह्मवृंद सहभागी होत, हा महायाग करीत आहेत.(dagadusheth_mandir)

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळा तर्फे अतिरुद्र महायाग मंदिरात करण्यात येत आहे. वेदमूर्ती नटराजशास्त्री आणि ब्रह्मवृंद होम, विधी करीत आहेत. मंदिराच्या सभामंडपात भव्य होमकुंड साकारुन हे अतिरुद्र होम करण्यात येत आहेत. मंगळवार, दिनांक २३ जुलैपर्यंत दररोज दुपारी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी मंदिरात सुरु राहणार आहेत. अतिरुद्र महायागाचे हे ४ थे वर्ष आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, श्री महालक्ष्मी श्री सुक्त, नवग्रह, अरुणाप्रश्न, पुरुषसुक्त, दुर्गा यांसह ३३ कोटी देवता याग व विविध अभिषेक असे धार्मिक विधी याअंतर्गत केले जात आहेत. तर, हर्विद्रव्य वनौषधीसहित पूर्णाहुती होणार आहे. मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे आरोग्यसंपन्न समाजाकरीता प्रार्थना करण्यात येत आहे. त्यातील अतिरुद्र होम हा या धार्मिक विधींतील सर्वोच्च बिंदू आहे.

गंगा, यमुना, इंद्रायणी, पंचगंगा, मुठा, अष्टविनायक येथील नद्या, ज्योर्तिलिंग नद्या, रामेश्वरम २१ कुंडांचे जल याकाळात वापरले जात आहे. तसेच २१ आयुर्वेदिक औषधी  वापर होम-हवनाच्या वेळी करण्यात येत आहे. सर्व नद्यांच्या एकत्रित केलेल्या मंत्रोच्चारीत पाण्याचा श्रींना जलाभिषेक करण्यात येत आहे. तरी भाविकांनी मंदिरात अतिरुद्र याग व विविध धार्मिक कार्यक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
18.1 ° C
18.1 °
18.1 °
63 %
1kmh
0 %
Sun
22 °
Mon
27 °
Tue
28 °
Wed
27 °
Thu
26 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!