पुणे : फायसर्व्हने आळंदी येथे एनएफबीएम ( NFBM ) जागृती स्कूल फॉर ब्लाइंड गर्ल्स येथे एका नवीन वसतिगृह सुविधेचे उद्घाटन करण्यासाठी नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाइंड महाराष्ट्रशी भागीदारी केली आहे. ही सुविधा व्यापक वयोगटातील दृष्टीहीन मुलींना विनामूल्य राहण्या-खाण्याची आणि शैक्षणिक साहाय्याची सुविधा प्रदान करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वातावरण तयार करेल.
अंदाजे २ कोटी रु. च्या गुंतवणुकीसह फायसर्व्हचा उद्देश वेगवेगळ्या प्रमाणात व्हिज्युअल अक्षमता असणाऱ्या १२० पेक्षा जास्त वंचित मुलींना सक्षम बनवण्याचा आहे. हा उपक्रम केवळ निवासी मदत करण्यापुरता मर्यादित नसून त्यात शिष्यवृत्ती, शैक्षणिक संसाधने आणि इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचा देखील समावेश आहे. या भागीदारीचा एक मुख्य भाग ब्रेल पब्लिशिंग सेंटरची स्थापना करण्याचा आहे, ज्याचा लाभ महाराष्ट्रातील सुमारे ७००० दृष्टीहीन विद्यार्थ्यांना होईल. या केंद्रामुळे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याची प्राप्यता वाढेल, जेणेकरून यशस्वी होण्यासाठीची साधने त्यांच्याकडे असतील ही खातरजमा होऊ शकेल.
उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी ग्लोबल सर्व्हिसेस, फायसर्व्हचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आणि सिनियर व्हाईस प्रेसिडेंट श्री. विशाल प्रतापवंत म्हणाले, “फायसर्व्ह येथे आमच्या कार्यस्थळी आणि व्यापक समुदायात समावेशकता आणि समता वाढविण्याबाबत आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्या जागतिक कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी कार्यक्रमामार्फत आम्ही समुदायांची पूर्ण क्षमता खुली करण्यासाठी त्यांच्याशी भागीदारी करतो. एनएफबीएम (NFBM ) जागृती स्कूल सोबत आम्ही राबवित असलेला उपक्रम अनोखा आहे, जो शिक्षण आणि सामाजिक समावेशाच्या छेदनबिंदूवर कार्यरत आहे. आम्ही दृष्टीहीन मुलींना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी समान संधी प्रदान करण्याबाबत वचनबद्ध आहोत.”
ही नवीन वसतिगृह सुविधा म्हणजे शिक्षण केंद्रस्थानी ठेवणाऱ्या उपक्रमांमार्फत एक चिरकाल टिकणारा प्रभाव पाडण्याच्या फायसर्व्हच्या व्यापक वचनबद्धतेचा एक भाग आहे. स्टेम (STEM )अनोखा प्रयोगशाळा, फायसर्व्ह शिष्यवृत्ती आणि बेघर मुलींसाठी वसतिगृह यांसारखे कार्यक्रम शिक्षणासाठी केलेल्या गुंतवणुकीस पूरक आहेत. फायसर्व्ह कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी कार्यक्रम सक्रियतेने लोकांना सशक्त बनवतो, समुदयांना पुढे घेऊन जातो, जबाबदार व्यवसाय प्रथांचा पुरस्कार करतो आणि सकारात्मक परिणामांसाठी शाश्वत प्रणालींमध्ये गुंतवणूक करतो.