29.5 C
New Delhi
Tuesday, July 1, 2025
Homeमहाराष्ट्र'एकनाथ शिंदे फाउंडेशन' तर्फे पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या निवासाची आणि भोजनाची सोय

‘एकनाथ शिंदे फाउंडेशन’ तर्फे पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या निवासाची आणि भोजनाची सोय

(पुणे) एकनाथ शिंदे फाउंडेशन’ तर्फे पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या निवासाची आणि भोजनाची सोय करण्यात आली आहे‌.त्या कार्यक्रमा अंतर्गत फाउंडेशनच्या स्वयंसेवकाकडून पोलीस लाईन, बाणेर रोड येथील उमेदवारांची भोजनाची सोय करण्यात आली. बुलढाणा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, परभणी अश्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या उमेदवारांना यावेळी एकनाथ फाउंडेशनतर्फे मदत करण्यात आली.


सध्या राज्यभरात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु आहे. या भरती प्रक्रियेसाठी राज्याच्या ग्रामीण भागातून युवक युवती भरतीच्या शहरात दाखल होत असतात.प्रत्येक उमेदवाराचा वैयक्तिक विचार केल्यास ही भरती प्रक्रिया दोन दिवस सुरु असते‌.काही कारणाने प्रक्रिया लांबल्यास ही प्रक्रिया तीन ते चार दिवस देखील चालते. हे युवक युवती निन्म आर्थिक गटातील असल्याने, सदर काळात हे युवक युवती भरती केंद्राच्या जवळच्या मोकळ्या जागेत ,रस्त्यावर उघड्यावर वास्तव्यास राहु नयेत तसेच त्यांना खाण्यापिण्याच्या काही अडचणीचा सामाना करावा लागू नये यासाठी एकनाथ शिंदे फाउंडेशनकडून हे मदतकार्य करण्यात आले‌.
सातत्याने गोरगरीब जनतेला मदत करण्यास तत्पर असलेले, फाउंडेशन म्हणून शिवसेना शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी स्थापन केलेले ‘एकनाथ शिंदे फाउंडेशन’ ओळखले जाते‌.या आधी नुकत्याच शहरात आलेल्या पुरासह मागील वर्षी रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावावर कोसळलेल्या दरडीच्या संकटासह अनेक नागरिकांच्या वैयक्तिक अडचणी सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे फाउंंडेशन ओळखले जाते. एकनाथ शिंदे फाउंडेशनकडून या उमेदवारांची आणि त्यांच्या पालकांची जेवणाची आणि राहण्याची सोय करण्यात आली आहे. संवेदशनील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या समाजसेवेतून प्रेरणा घेत, एकनाथ शिंदे फाउंडेशन वेळोवेळी गरजूंना मदत करण्यासाठी तत्पर असते‌.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
29.5 ° C
29.5 °
29.5 °
71 %
3.1kmh
5 %
Tue
30 °
Wed
38 °
Thu
35 °
Fri
36 °
Sat
34 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!