पुणे- नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुणे विभागात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बनावट दारू विरोधात मोठी कारवाई करण्यात आलेली पाहायला मिळत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यातून 1 कोटीहून अधिक रुपयांची बनावट दारू जप्त केली आहे. या कारवाई एकूण 1668 बनावट मद्याच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोवा राज्यातून बनावट दारू पुणे शहरासह गुजरातमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात येणार होती. नववर्षाच्या पूर्व संध्येला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. या नाकाबंदीत सुमारे 1 कोटी 20 लाख रुपयांची बनावट दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण 1668 बनावट मद्याच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत. त एकूण 9 जणांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तर नागपूर गुन्हे शाखेने ५० लाखांपेक्षा जास्त किंमतीचं ड्रग्ज केलं जप्त केले आहे. या प्रकरणी सुमित चिंतलवारसह चार आरोपींना अटक करण्यात आली. नागपूर पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या एनडीपीएस पथकाने ही कारवाई केली आहे. आरोपींकडून 550 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून नव वर्षाच्या पार्ट्यांवर नागपूर पोलिसांची बारीक नजर असणार आहे.