पुणे- राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या(MSRTC) कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला असून कर्मचाऱ्यांना दिवाळीआधीच त्यांचा पगार मिळणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी लागणारी रक्कम राज्य सरकारने महामंडळाकडे वर्ग केली आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ३५० कोटी रुपयांचा निधी प्रदान करण्यात आला आहे. दिवाळी सणानिमित्त एसटी कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपयांची दिवाळीभेट देण्यात येते. यंदा ही भेट कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी अतिरिक्त निधीची मागणीही महामंडळाने राज्य सरकारकडे केली आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान होत असतो. मात्र दिवाळी पगाराच्या एक आठवडा आधीच असल्याने दिवाळीत आर्थिक खर्च, सणांसाठीची खरेदी कशी करायची असा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांसमोर होता. मात्र कर्मचाऱ्यांची ही समस्या आता राज्य सरकारने दूर केली आहे. दिवाळीच्या काळात प्रवासासाठी एसटी बसचा सर्वाधिक वापर होतो. या काळात एसटीचे महसूलही वाढत असते. दरवर्षी दिवाळीच्या काळात एक महिन्यासाठी होणारी १० टक्के हंगामी भाडेवाढ यंदा रद्द केली आहे.
New Delhi
mist
29.1
°
C
29.1
°
29.1
°
84 %
1kmh
40 %
Thu
29
°
Fri
33
°
Sat
38
°
Sun
38
°
Mon
38
°