पुणे- गेली 40 वर्ष काँग्रेस पक्षाची सेवा केल्यानंतर आणि हाताचा पंजा हे माझं निवडणूक चिन्ह नसतानाची ही माझ्या आयुष्यातील पाहिली निवडणूक मी लढवत आहे .अस का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे आणि असणार ..मी एका सर्व सामान्य कुटुंबातून समाज सेवा करत राजकारणात आले. सर्व सामान्य लोकांचे मूलभूत प्रश्न सोडवावेत हेच माझे ध्येय आणि हीच माझी आवड.मी लोकांमध्येराहून लोकांना काय अडी अडचणी आहेत ते समजून घ्यायचे आणि मार्ग शोधायचे. कधी यश मिळायचे कधी नाही पण मी काम करत राहिले आणि जे काही शक्य असेल ते करीत राहिले.मी माझ्या प्रपंच्या पेक्षा समाजातील महिला भगिनी चा प्रपंच कसा चांगला आणि सुखकर होईल हा प्रयत्न करत राहिले.मला राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फ़ुले यांचा इतिहास आणि वारसा असलेल्या पुण्य नगरीच्या पहिल्या महिला महापौर होण्याचा सन्मान मिळाला आणि मी कृतकृज्ञ झाले.पुणे महानगरपालिकेच्या इतिहासात सतत ५ वेळा नगरसेविका म्हणून मी निवडून येणारी एकमात्र महिला आहे आणि ही मला ही संधी देणाऱ्या मतदारांची मला दिलेली माझ्या कामाची पावती आहे असं मी समजते.मी काँग्रेस पक्षांशी एकनिष्ठ राहून मला पक्षा साठी जे काही करता येईल ते गेली 40 वर्ष केले.पक्षाच्या वाईट काळात पण पक्षाला धरून राहिले .पक्ष जी जबाबदारी देईल ती प्रामाणिक पणे पूर्ण करत राहिले आणि काहीही न अपेक्षा ठेवता.पण गेली 40 वर्ष मी एक अनुभव घेतला जो मला अत्यंत वेदना देत आहे..गेल्या 40 वर्षात या राजमाता जिजाऊ आणि क्रांतिजोती सावित्री बाई फुले यांच्या पुण्यनगरीत कांग्रेस पक्षाने कोणत्याही विधानसभा मतदार संघात एकाही महिलेला उमेदवारी दिलेली नाही..आणि अस का ? हेच मी आणि माझ्या सारख्या अनेक महिला संभ्रमात आलो आहोत ..आणि विचारत आहोत…विचारांची लढाई असणाऱ्या भारतीय जनता पार्टी ने मात्र कायम महिलांचा सन्मानच केला आहे हे मान्यच करावं लागेल ..महिला राजकारणात यायला हव्यात आणि 50% स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना आरक्षण देणारा माझा पूर्वश्रमी काँग्रेस पक्ष या संदर्भात कमी पडला आणि हे मान्यच करावं लागेल .काँग्रेस पक्षात येऊ इच्छिणाऱ्या महिला मुली जेव्हा मला विचारतात की या पक्षात यायचं असेल तर राजकीय भवितव्य काय? तेव्हा हा प्रश जिव्हारी लागतो .पण नेत्यांना त्याची चिंता नाही करण त्यांना कोणी विचारत नाही आणि विचारणार पण नाही .. मला माझ्या राजकीय प्रवासात आता काही तरी निर्णय हा घ्यावाच लागणार आहे आणि होता ..कसबा विधानसभा मध्ये सतत निवडून येणारी एकमात्र महिला मी होते पण पक्षाला मी दिसले नाही.
काँग्रेसला महिलांचे वावडे का?
कमल व्यवहारे यांचा सवाल?
RELATED ARTICLES
New Delhi
haze
26.1
°
C
26.1
°
26.1
°
34 %
2.6kmh
0 %
Mon
26
°
Tue
28
°
Wed
27
°
Thu
26
°
Fri
26
°