29.1 C
New Delhi
Saturday, October 25, 2025
Homeमहाराष्ट्रकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सन्मान.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सन्मान.

पंढरपूर – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाच्या सहाव्या टप्प्याच्या चौपदरीकरण कामाचा भूमीपूजन समारंभ नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री भारत सरकार यांच्या हस्ते कर्वे नगर, पुणे येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरच्या वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर vithalmandir यांच्या हस्ते वारकरी पगडी, विना, चिपळ्या, श्रींची मूर्ती व शेला देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मंदिर समितीच्या सदस्या ऍड. माधवी निगडे व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपस्थित होते.pandharpur

“पंढरीची वारी” हा वारकरी संप्रदायाबरोबरच अवघ्या महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक व सामाजिक जीवनाचे अधिष्ठान असलेला विषय आहे. पंढरीच्या वारीला शेकडो वर्षांची अध्यात्मिक परंपरा आहे. ज्या मार्गाने शेकडो वर्षांपूर्वी “संतांची पाऊले” चालली व आताच्या काळात प्रतिवर्षी लाखो भाविक-भक्त-वारकरी चालतात त्या मार्गाचे सुशोभीकरण व सोयी- सुविधांमुळे सुखकर झालेली वारी ही आपले अथक प्रयत्न, नियोजन व मार्गदर्शनाने संतांच्या पालखीमार्गाच्या विस्तृतीकरणाने वैष्णवांच्या या मांदियाळीची मोठी सेवा आपण शासनाला घडविलीत, याबद्दल गडकरीं यांचे कृतज्ञता पत्र देऊन सहस्रशः अभिनंदन करण्यात आले.

या कार्यक्रमास केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्यांचा देखील मंदिर समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि आळंदी व देहू संस्थानांच्या प्रमुख विश्वस्तांचा देखील नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
29.1 ° C
29.1 °
29.1 °
37 %
1kmh
20 %
Sat
32 °
Sun
33 °
Mon
32 °
Tue
31 °
Wed
32 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!