18.1 C
New Delhi
Saturday, October 25, 2025
Homeमहाराष्ट्रगणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवालाही समान नियम करा

गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवालाही समान नियम करा

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे मनपा आयुक्तांना निर्देश

पुणे –

गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवालाही समान नियम करावेत, असे निर्देश नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पत्राद्वारे आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे नवरात्रोत्सव मंडळांनीही नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

गणेशोत्सव सर्वांना उत्साहाने साजरा करता यावा; यासाठी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यातच गणेशोत्सव काळातील स्वागत कमानी आणि इतर जाहिरातीवरील शुल्क माफ करण्याचा महापालिका आयुक्तांनी घेतला होता. त्यामुळे सर्व गणेशभक्तांना मोठ्या आनंदात गणेशोत्सव साजरा करता आला.

नवरात्रौत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शहरात देवीच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे. त्यातच महापालिकेकडून नवरात्रोत्सव मंडळांना जाहिरात शुल्क आकारले जात असल्याने नवरात्रोत्सव मंडळाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे सदर शुल्क माफ करण्यात यावे, अशी विनंती नवरात्रोत्सव मंडळांनी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली होती. त्यावर नामदार पाटील यांनी आयुक्तांना पत्राद्वारे शुल्क माफ करण्याचे निर्देश दिले आहेत.

पुणे शहरात नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या उत्सवात काळात अनेक सार्वजनिक मंडळे गणेशोत्सवाप्रमाणे सार्वजनिक नवरात्रौत्सव साजरा करतात. तसेच, या नवरात्रोत्सवात अबालवृद्ध, स्त्री, पुरुष मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. या उत्सव काळात महापालिकेकडून नवरात्रोत्सव मंडळांकडून जाहिरात शुल्क आकारले जाते. सदर शुल्क आकारले जाऊ नये, असे निर्देश नामदार पाटील यांनी पत्राद्वारे आयुक्तांना दिले आहेत.

दरम्यान, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या भूमिकेमुळे नवरात्रोत्सव मंडळांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्याबद्दल सर्व मंडळाच्या वतीने दादांप्रती कृतज्ञता व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
18.1 ° C
18.1 °
18.1 °
88 %
0kmh
0 %
Sat
32 °
Sun
33 °
Mon
32 °
Tue
32 °
Wed
32 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!