25.1 C
New Delhi
Tuesday, October 21, 2025
Homeमहाराष्ट्रगोसेवा आयोग महाराष्ट्र शासन च्या व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशन

गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन च्या व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशन

राज्यपाल सी पी राधाकृष्णन जी यांच्या हस्ते प्रकाशन ; गो सेवा आयोगाच्या सर्व सदस्यांची उपस्थिती

पुणे : गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन च्या व्हिजन डॉक्यूमेंट चे प्रकाशन राज्यपाल सी पी राधाकृष्णन जी यांच्या हस्ते मुंबई येथील राजभवनात झाले. या प्रसंगी गोसेवा आयोग ची स्थापना चे उद्देश व गोसेवा आयोग च्या आतापर्यंत च्या कार्याची सविस्तर माहिती आयोग चे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी राज्यपालांना दिली.सुधारित गोवर्धन गौवंश योजना च्या माध्यमातून राज्यातील पात्र गोशाळांना २५  ते १५ लाख निधी वितरित करण्यात आला. परिपोषण योजना द्वारे राज्यातील गोशाळा मधील देशी गायीसाठी प्रतिदिन प्रति गाय ५० रु व राज्य सरकार ने नुकतेच देशी गाय ला राज्यमाता – गोमाता घोषित केले, अशी माहिती आयोग चे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली.आयोगाचे सदस्य डॉ नितीन मार्कंडेय यांनी महाराष्ट्र गोवंश प्रजनन कायदा (नियमन ) बद्दल माहिती दिली. आयोग चे सदस्य डॉ सुनील सूर्यवंशी व डॉ उद्धव नेरकर यांनी गौआधारीत कृषी प्रशिक्षण बद्दल सविस्तर माहिती दिली. आयोग चे सदस्य संजय भोसले यांनी महाराष्ट्रात गोमंत्रालय व्हावे, अशी विनंती राज्यपाल यांना केली.आयोग चे सदस्य मनिष वर्मा व परेश शाह यांनी राज्यपालांचा गोमाता ची विग्रह ,प्रतिमा देऊन आभार प्रकट केले. राज्यपालांनी  गो आधारित कृषी साठी राज्य सरकार व गोसेवा आयोग मिळून निर्णायक व परिणामकारक कार्य व्हावे या विषयी सविस्तर चर्चा केली. गोसेवा आयोग च्या आतापर्यंत च्या कार्यप्रणालीवर सी पी राधाकृष्णन यांनी भरभरून कौतुक केले व भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
smoke
25.1 ° C
25.1 °
25.1 °
69 %
1.5kmh
40 %
Tue
33 °
Wed
33 °
Thu
33 °
Fri
33 °
Sat
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!