28.1 C
New Delhi
Sunday, March 23, 2025
Homeमहाराष्ट्रचंद्रकांत दादा पाटील यांनी प्रचारात आघाडी

चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रचारात आघाडी

पुणे :सध्या विधानसभेचे राज्यात चांगलेच वारे वाहू लागले आहेत. अशातच आता कोथरूड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी-महायुतीचे लोकप्रिय उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. कोथरूड परिसरातील सोसायट्यांमध्ये संपर्क साधून आणि तेथील मतदारांशी संवाद साधून चंद्रकांतदादा हे घरोघरी पोहोचण्यात यशस्वी होत आहेत. पहिल्या टप्प्यातील प्रचारात तर त्यांनी चांगलीच मुसंडी मारली आहे. कोथरूडमध्ये विरोधी पक्षांतर्फे कोण उमेदवार, हे निश्चित होण्यापूर्वीच चंद्रकांतदादांचे कार्यकर्ते प्रत्यक्ष संपर्काद्वारे किंवा पदयात्रेद्वारे अनेक ठिकाणी पोहोचलेसुद्धा ! चंद्रकांत दादांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीत जो जनसागर उसळला होता, तो पाहता कोथरूडमधून त्यांचा विजय हा प्रचंड मताधिक्याने होईल, हे जवळजवळ निश्चित झाले आहे. ‘आरंभ है प्रचंड’ असे म्हणतच त्यांचे अनेक कार्यकर्ते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत, पुढील वीस दिवस चंद्रकांत दादांसाठी, त्यांच्या विजयासाठी देण्याचे सर्वांनी निश्चित केले असल्याचे दिसत आहे.

प्रतिष्ठित नागरिकांच्या गाठीभेटी

चंद्रकांत दादांच्या पदयात्रांचा किंवा प्रचाराचा सहज कानोसा घेतला तर सोसायट्यांच्या समस्या सोडवत असतानाच, त्या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन गरजेच्या आवश्यक सुविधा कशाप्रकारे उपलब्ध करून देता येतील, यावर त्यांनी भर दिला आहे. या समस्या सुटाव्यात यासाठी नागरिकांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. कोथरूड मतदारसंघामध्ये प्रचाराचा पहिला टप्पा चंद्रकांत दादांनी धुमधडाक्यात सुरू केला असून कोथरूड परिसरातील अनेक सोसायट्यांमधून संपर्क साधत आणि तेथील नागरिकांशी संवाद साधत असतानाच या परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांना भेटून चर्चा करण्यावर त्यांनी भर दिला आहे. प्रचाराच्या या पहिल्या टप्प्यात त्यांनी कोथरूड, बाणेर, बालेवाडी, पौड रस्ता या परिसरातील सोसायट्यांना त्यांनी भेट देण्यासाठी जोमात सुरुवात केली आहे.

कोथरूड विधानसभा मतदार संघातून चंद्रकांत दादांना उमेदवारी मिळणार हे पूर्वीच निश्चित झाल्यामुळे त्यांना प्रचारासाठी भरपूर वेळ मिळाला आहे. याउलट विरोधकांतर्फे कोण, हा घोळ आणि चर्चेचे गुऱ्हाळ शेवटपर्यंत सुरूच होते. उमेदवार शोधणे, त्याला सक्रिय करणे ही विरोधकांची मोठी मोहीम ठळकपणे दिसून आली. हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडे राहणार आणि चंद्रकांतदादा हेच उमेदवार असणार, हे आधीच ठरल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचे सूत्र आधीच निश्चित झाले होते आणि त्यानुरूप प्रचाराला सुरुवातही झाली आहे. भारतीय जनता पार्टी आणि संघ परिवाराचे त्याचप्रमाणे हिंदुत्ववादी आणि मित्रपक्षांचे कार्यकर्ते, झटून कामाला लागले असून अतिशय सूक्ष्म नियोजन, प्रत्येक दिवसाचे कार्यक्रम यांची आखणी झाली आहे. त्याप्रमाणे गाठीभेटींवर भर देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
28.1 ° C
28.1 °
28.1 °
30 %
2.1kmh
0 %
Sun
30 °
Mon
37 °
Tue
39 °
Wed
39 °
Thu
38 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!