पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत धर यांचे दापोडीकरांनी रेकॉर्ड ब्रेक स्वागत केले. डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी दापोडी परिसरात प्रचार फेरी काढली होती. यावेळी न भूतो न भविष्यती असे दापोडीकरांनी त्यांचे स्वागत केले. फुलांचा प्रचंड वर्षाव आणि शेकडो ज्येष्ठांच्या आशीर्वादाचा वर्षाव व राम कृष्ण हरी वाजवा तुतारी अशा घोषणांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी दापोडीतील फिरंगाई देवी चौकातून आपल्या प्रचार फेरीला सुरुवात केली होती. यावेळी हजारो नागरिक तेथे त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. कंटेनर भरून फुले आणून त्या फुलांच्या वर्षावात डॉ. सुलक्षणा शिलवंत यांचे अबूतपूर्व स्वागत करण्यात आले. सुलक्षणा शिलवंत दापोडीतील ज्या ज्या परिसरात फिरल्या तेथे रस्त्यावर शेकडो नागरिक त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. ज्येष्ठांनी यावेळी अक्षरशः आशीर्वादांचाही वर्षाव केला.
नेहरू चौक, सिद्धार्थ नगर, जय भीम नगर, भाजी मंडई, नरवीर तानाजी पुतळा, शिवशक्ती तरुण मंडळ, पवार वस्ती, गुलाब नगर, एस एम एस कॉलनी, आदी परिसरात सुलक्षणा शिलवंत यांचे स्वागत करण्यात आले.
डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्यावर फुलांचा वर्षाव
दापोडीकरांनी केले जोरदार स्वागत
RELATED ARTICLES
New Delhi
fog
9.1
°
C
9.1
°
9.1
°
100 %
0kmh
0 %
Thu
23
°
Fri
23
°
Sat
18
°
Sun
21
°
Mon
22
°