पुणे : पुणे शहराची वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणूक अत्यंत शांततेत आणि उत्साहात पार पाडली. २८ तास चाललेल्या या मिरवणूकीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली नसल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी दिली. मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या आरतीने विसर्जन मिरवणूकीस सुरूवात झाली. त्यानंतर बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत ही मिरवणूक चालली. मिरवणूक संपल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), DCP संदीपसिंह गिल (Sandeep Singh Gill) यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले की, गणेश विसर्जन मिरवणूक अत्यंत शांततेत आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडली. त्यासाठी शहर पोलीसांतर्फे मी सर्व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो. धन्यवाद देतो. त्यांनी पोलिसांशी चांगला समन्वय ठेऊन मिरवणूक चांगल्या वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य केले. त्याचबरोबर शहरात दाखल झालेल्या गणेश भक्तांचा जनसमूदाय जरी मोठा असला तरी त्यांचे देखील पोलिसांना सहकार्य मिळाले. पोलीस आयुक्त म्हणाले की, मिरवणूकीत लेझर लाइट वापरावर पूर्णपणे बंदी होती. मिरवणुकीच्या मुख्य मार्गांवर लेझर लाइटचा उपयोग झालेला नाही. जिथे लेझर लाइटचा वापर आढळला तेथे पोलीस ते बंद करायला लावत होते. तरी देखील किती जणांनी त्याचा वापर केला आहे याचा आकडा अद्याप आलेला नाही. त्याचा आढावा घेऊन संबंधित मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. आवाजाचे रिडिंग घेण्यात आले आहे. ते बघून ज्या मंडळांनी ध्वनीची मर्यादा ओलांडली आहे त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे.
तब्बल २८ तास चालली बाप्पांची मिरवणूक
गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत !
RELATED ARTICLES
New Delhi
haze
23.1
°
C
23.1
°
23.1
°
53 %
1kmh
0 %
Sat
26
°
Sun
35
°
Mon
37
°
Tue
39
°
Wed
39
°