सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे आमनेसामने आहेत. दोन्ही नेत्यांनी निवडणुकीत कमालीचा जोर लावल्याचं पहायला मिळतंय. एकीकडे शशिकांत शिंदे यांच्यासाठी खुद्द शरद पवारांनी कॉलर उडवलीये. तर दुसरीकडं अजितदादांनी उदयनराजे यांच्यासाठी साताऱ्यात सभा घेतली. त्यावेळी त्यांनी जोरदार भाषण केलं अन् कमळाचं काम करा, अशा सुचना उदयनराजेंना दिल्या आहेत. त्याचबरोबर उदयनराजेंना खासदार करायचेय, त्यामुळे जोमाने काम करा, असे आवाहन देखील अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केले. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांनी मोठी घोषणा केली अन् राज्यसभेवर कोण जाणार? याचे नावच जाहीर केले.
काय म्हणाले अजित पवार?
सातारा आणि जावळीमधून शिवेंद्रराजे यांनी एक लाखांचे लीड दिले पाहिजे. पाटणमध्ये देखील चांगले लीड मिळाले पाहिजे. काहीही करून ही निवडणूक आपल्याला जिंकायचीच आहे. पायाला भिंगरी बांधा आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कमी पडू देवू नका, असे अजित पवार यांनी म्हटलेय. उदयनराजे भोसलेंना वाई, महाबळेश्वर आणि खंडाळ्यातून लाख मतांचे लीड द्या. ज्यांचे आपल्याशी जमत नाही तेही कमळाचे काम करतात, असे म्हणत अजित पवारांनी सुचक वक्तव्य केले. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना एक आश्वासन देखील दिलेय. तुम्ही काळजी करून नका, तुम्ही फक्त उदयनराजेंना निवडून आणा. तुम्ही माझे काम करून दाखवा. मी जूनमध्ये नितीन काकाला खासदार करतो, असे केले नाही तर पवारांची अवलाद सांगणार नाही, असे अजित पवार यावेळी म्हणाले.
अनेक निवडणुकांमध्ये किंगमेकरची भूमिका बजावणारे नितीन पाटील यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून तिकीटासाठी आग्रही होते. मात्र, साताऱ्याची जागा भाजपकडे गेल्याने नाईलाजाने नितीन पाटील यांना माघार घ्यावी लागली. उदयनराजेंच्या राज्यसभेच्या जागेवर आता नितीन पाटील यांचा फिक्स नंबर लागणार, अशी चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. आता साताऱ्याच्या जागेच्या मोबदल्यात राष्ट्रवादीला राज्यसभा मिळणार हे अजित पवारांच्या वक्तव्याने जवळजवळ निश्चित झालेय.
दरम्यान, शशिकांत शिंदेंच्या प्रचारासाठी पवारांची पाटणमध्ये जाहीर सभा झाली. या वेळी शरद पवारांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. शरद पवारांचे भाषण संपल्यानंतर लोकांमधून एकच जल्लोष केला. त्यातील काहींनी पवारांकडे कॉलर उडवण्याचा आग्रह धरला. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पवारांनीही उत्स्फूर्तपणे कॉलर उडवल्याचे पहायला मिळाले.
’…तर पवारांची औलाद सांगणार नाही
साताऱ्यात अजित पवारांची गर्जना
RELATED ARTICLES
New Delhi
mist
22.1
°
C
22.1
°
22.1
°
88 %
0kmh
75 %
Thu
27
°
Fri
30
°
Sat
32
°
Sun
33
°
Mon
30
°


