29.1 C
New Delhi
Monday, November 4, 2024
Homeमहाराष्ट्रदगडूशेठ' गणपतीला मेरिडियन आइस्क्रीम तर्फे ५१ लिटरचे मोदक आईस्क्रीम 

दगडूशेठ’ गणपतीला मेरिडियन आइस्क्रीम तर्फे ५१ लिटरचे मोदक आईस्क्रीम 

तब्बल ७०० गणेशभक्तांना वाटप ; निलेश चव्हाण, अशोक चव्हाण यांचा पुढाकार

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला गणेशोत्सवात विविध मिष्टांनाचा नैवेद्य दाखवला जातो. मात्र, यंदाच्या उत्सवात मेरिडियन आइस्क्रीम तर्फे चक्क ५१ लिटरचे मोदक आईस्क्रीमचा नैवेद्य बाप्पाला दाखाविण्यात आला.

यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, मेरिडियन आईस्क्रीम चे निलेश चव्हाण, अशोक चव्हाण, पूजा चव्हाण, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते. मोदक आईस्क्रीम उत्सवमंडपात उपस्थित तब्बल ७०० गणेशभक्तांना प्रसाद म्हणून देण्यात आले.

निलेश चव्हाण म्हणाले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे जगभरातील गणेशभक्तांचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे बाप्पाला आम्हा हा मोदक आईस्क्रीम चा नैवेद्य अर्पण करीत आहोत. हा मोदक ५१ लिटरचा असून गूळ, नारळ, इलायची, खसखस, आईस्क्रीम वापरून साकारण्यात आला आहे. तसेच त्यावर चांदीचे वर्क आणि केशर देखील लावण्यात आले आहे.

मेरिडियन आइस्क्रीम च्या नांदेड सिटी येथील फॅक्टरी मध्ये तब्बल ७ दिवस हे मोदक आईस्क्रीम तयार करण्याचे काम सुरु होते. तसेच याकरिता १० कारागिरांनी मेहनत घेतली आहे. आज दगडूशेठ गणपती चरणी हे मोदक आईस्क्रीम आम्ही अर्पण करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
29.1 ° C
29.1 °
29.1 °
39 %
1kmh
0 %
Mon
32 °
Tue
32 °
Wed
33 °
Thu
34 °
Fri
34 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!