21.1 C
New Delhi
Sunday, March 23, 2025
Homeमहाराष्ट्रदहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी!

दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी!

पुरवणी परीक्षेची तारीख जाहीर


मुंबई – दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा घेण्यात येते. यंदा दहावी बारावी परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात लवकरात लवकर प्रवेश मिळावा यासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये परीक्षा न घेता जुलै-ऑगस्टमध्ये परीक्षा घेण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. यासंदर्भात तारीख देखील जाहीर केल्या आहेत.
’या’ तारखेला होणार पुरवणी परीक्षा
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थींची पुरवणी परीक्षा जाहीर झाली आहे. 16 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान परीक्षा होणार आहे. दहावीची पुरवणी परीक्षा 10 जुलै ते 30 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. तर बारावीची 16 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे.
दरम्यान, दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी कोणतेही शुल्क न घेता प्रवेशपत्राची मुद्रित प्रत विद्यार्थ्यांना देण्याची सूचना राज्य मंडळाचे प्रभारी सचिव शैलेंद्र पाटील यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
21.1 ° C
21.1 °
21.1 °
64 %
1kmh
0 %
Sat
25 °
Sun
34 °
Mon
37 °
Tue
39 °
Wed
39 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!